आरोग्यमहाराष्ट्रशहरसामाजिक

आनंद नगर झोपडपट्टीच्या मुलभूत प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेणार नसेल तर जन आंदोलन उभारू-युवराज दाखले

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी-चिंचवड दि. २२ जानेवारी २०२४ मावळ लोकसभा अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड स्टेशन या ठिकाणी नागरिक सुविधा पासुन वंचित आसल्याचे चित्र पाहायला मिळाले. एम. एस. एस. बी. ची लाईट सकाळी सहा वाजता जाते व सायंकाळी सात वाजता येते ही अत्यंत गंभीर बाब आहे.
येथील स्वच्छतागृह रोजच्या रोज साफसफाई न केल्यास सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा बैठकीत देण्यात आला.
तसेच मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून दुसरे मातंगरूषी साहित्य संमेलन दि ११ फेबुरवारी २०२४ काळेवाडीतील राजवाडा लॉन्स या ठिकाणी आयोजित केलं आहे त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे अहवान प्रा. धनंजय भिसे सर यांनी केले.
या बैठकीचे आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे यांनी केले. यावेळी समाज बांधव अविनाश शिंदे, राजु आवळे, दिलीप शिंदे, मोहन भिसे, मंगेश डाखोरे, प्रा. धनंजय भिसे, आण्णासाहेब कसबे, दिलीप शिंदे, माजी अध्यक्ष तथा समन्वयक प्रमुख डी. पी. खंडाळे, समन्वयक चंद्रकांत दादा लोंढे, लोकसेवक युवराज दाखले, निलेश गायकवाड, रवि मोतीरावे, अंकुश फुलावळे, कैलास कसबे, पांडुरंग कसबे, रूशीकेश कसबे, दशरथ कांबळे, नामदेव चांदणे, तुकाराम चव्हाण, राम कसबे, शाम कसबे, मधुकर कसबे, सुहास अडागळे, जगन्नाथ आडसुळे, बाळु चांदणे, पिंकी चांदणे, प्रगती चांदणे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!