मनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीद्वारा आयोजित कोंढाणे बुद्ध लेणी धंम्म सहल यशस्वीरित्या संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ जानेवारी २०२४ बुद्ध धम्माच्या पाऊलखुणा संपूर्ण देशात पसरल्या आहेत. या पाऊल खुणा प्रत्यक्ष पाहून अनुभव घेणे म्हणजे कुशल कर्माचा संचय होय. म्हणून रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक “भीमसृष्टी” पिंपरी येथून कोंढाणे बुद्ध लेणी जिल्हा रायगड तालुका कर्जत या ठिकाणी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीद्वारे अद्वितिय धंम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
जेणेकरून अल्पवधीमध्ये महाराष्ट्रातील भगवान बुद्धांच्या पाऊलखुणा पुणे जिल्ह्यातील सामान्य उपासकांना सहजपणे पाहता आणि समजून घेता येतील. लहान असो व मोठे तरुण असो वा वरिष्ठ सर्वांनी या धंम्म सहलीमध्ये तब्बल १५० उपासक उपसिका यानी सहभाग घेतला होता. एवढेच नव्हे तर काही उपासक हे लातूर, नांदेड, कराड, उस्मानाबाद, अकोला, बीड, व मुंबई या परिसरातून येऊन या उपक्रमास हजेरी लावली.
भिम सृष्टी पिंपरी येथे बाबासाहेबांना अभिवादन करून या दोन्हीही बसमधील १२० सदस्य कोंढाणे बुद्ध लेणी कडे जात असताना प्रवास सूखकर व्हावा म्हणून बुद्ध, भीम, गीते गात या प्रवासाला सूरूवात झाली. यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक गोविंदजी गाडे दादा, महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका साधनाताई मेश्राम व गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी सूमधूर आवाजात बुद्ध भीम गीते सादर केली. या गीतगायनात मंत्रमूग्ध होत केव्हां पिंपरी तून निघालो अन केव्हां कोंढाणे लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहचलो हे समजलेच नाही.
आता पूढील प्रवास हा पायी होता धम्म सहलीस आलेले सर्व सदस्य रांगेमध्ये लेणी कडे मार्गक्रमण करत होते. पायथ्यापासून कोंढाणे या बुद्ध लेणीचे अंतर साधारण पणे १.५ किमी इतके आणि त्यात ओबड धोबड पाऊलवाट असा प्रवास गप्पागोष्टीत केव्हां संपला समजलेच नाही यात तब्बल ८५-९० वर्षाच्या वरिष्ठांसोबत लहान-थोर ही होते. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रवास फार मंगलदायी ठरला.
सर्व सदस्य अर्ध्या तासांमध्ये लेणीमध्ये पोहोचले व तेथे आमचे आधी मुंबई येथील लेणीप्रेमी लेणीच्या माहितीचे बोर्ड लावण्यासाठी उपस्थित होते.
लेणी मध्ये प्रवेश केल्यानंतर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कोंढाणे बुद्ध लेणी वर पोहोचताक्षणी सर्व उपासक उपासिका हर्शोलाशित झाले. आलेल्या सर्व सदस्यांनी तथागत भगवान बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पूज्य भंन्ते यांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील देण्याची याचना करण्यात आली व सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
इतिहास प्रेमी मनोज गजभार यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली व पुष्प माला अर्पण समितीचे सदस्य प्रमोद गायकवाड सर यांनी बुद्ध लेण्यांमध्ये सतत का आले पाहिजे या विषयी सर्वांना मार्गदर्शन केले.
कराड येथील आलेले लेणीप्रेमी कैलास कांबळे यांनी लेण्यांच्या प्रचार प्रसार कशाप्रकारे करता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या सदस्या सुजाताताई नवघरे यांनी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती करत असलेल्या कार्याला उजाळा दिला.
बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीचे सदस्य राजू भालेराव यांनी बुद्ध लेणी आपलाच वारसा हा विषय घेऊन सर्वांना मार्गदर्शन केले.
बोधिसत्व यूट्यूब चॅनल चे संचालक इतिहास प्रेमी सागर कांबळे यांनी या लेण्यांचा इतिहास व लेण्यांची निर्मिती का करण्यात आली या विषयी आलेल्या सर्व सदस्यांना सोप्या भाषेत अनमोल असे मार्गदर्शन केले.
लेणी प्रेमी मनोज गजभार यांनी या लेणीतील शिलालेखांचे वाचन करून सर्वांना समजावून सांगितले व लेण्यांची थोडक्यात माहिती दिली.
राजू भालेराव यांनी या ठिकाणी आलेल्या सर्व बंधू-भगिनींचे आभार मानले व या धम्म सहलीस महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील उपासक उपासिका उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने लातूर, उस्मानाबाद, सातारा, अकोला, सांगली, बीड तसेच मुंबई येथील व पिंपरी चिंचवड पुणे येथील १५० सदस्य उपस्थित होते.
ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी रवी कांबळे, महायान मसुरे, राजू भालेराव, प्रियाताई शेख, रोहिणीताई लादे, सुजाताताई बनसोडे, अशोक बडेकर, राम शिंदे, राजू सरतापे, सिद्धू कांबळे व राहुल कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.
या धंम्म सहलीस पी.एस.आय रसाळ साहेब, ए. एस. आय. सिरसाठ साहेब, विवेक वाघमारे, सुरेश वाघमारे, विनोद कांबळे, विलास नवघरे यूवराज सिरसाठ , नवनाथ सोरटे, आदित्य जाधव, सत्यभामा रेंगे, राजाबाई हौले, कमलाबाई डोळस, इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!