अभिनंदनअमरावतीउत्सवमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“क्रांतिज्योती सावित्री आईची लेक मा.आयुक्त नयना गुंडे यांना दीपस्तंभ विचारपुष्प देऊन कार्याचा गौरव”

“उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचा सहभाग “

प्रतिनिधी अमरावती दि. २२ ऑगस्ट २०२६ भारतीय स्वातंत्र्यदिनचे औचित्य साधून समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या संकल्पनेतील ‘सन्मान कर्तुत्वाचा’ अभियान अंतर्गत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांची कर्तृत्ववान लेकिंचा मान
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना ‘फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील दीपस्तंभ, हे विचारपुष्प सन्मानपूर्वक देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
तसेच स्थानिक कॅम्प परिसरातील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासंद‌र्भात त्यांचेसोबत चर्चा केली असता, सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक क्रांती कार्याची प्रेरणा घऊनच आजच्या महिला या सर्वच क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत आहेत, त्यामुळे जि.प.गर्ल्स हायस्कूलला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे हे योग्यच असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी फुले-शाहू-
आंबेडकर चळवळीचा समर्थ साथीदार वऱ्हाड विकासचे संपादक व उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, सुनील वासनकर, ज्योती बाविस्कर, वसंतराव भडके, राजेंद्र बडे, निता डाखोरे, शबाना परवीण, संजय शिरमाते, पदमा पुरी सह सामाजिक चळवळीतील पदाधिकारींनी मा.आयुक्त नयना गुंडे (मॅडम) यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button