धक्कादायक! मराठी अभिनेत्रीवर बलात्कार पूणे पोलिसांत तक्रार..

प्रतिनिधी पूणे दि. २९ जानेवारी २०२४ पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय ३५) रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर याच्याविरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती. यावरुन विराज रविकांत पाटील याच्यावर आयपीसी ३७६, ३७६ (२) (एन), ३७७, ३२३, ५०४, ५०६, सह आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते, तिने मराठी चित्रपटात ही काम केले आहे. पण अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत विचारणा केली. मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती. त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ देखील केली असल्याचे तक्रारीत उल्लेख आहे.



