महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये हेवेदावे व गटतटाच्या राजकारणात वाढ..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ फेब्रुवारी २०२४ काल झालेल्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट)च्या पत्रकार परिषदेत महिला अध्यक्षाची व यूवा अध्यक्षांची उनिव दिसली. बाहेर विचारपूस केले असता सूत्रांनकडून अशी माहिती हाती लागली आहे की साधारणता आठ दिवसा पूर्वी पक्षाच्या वरिष्ठ पदावरील एक नेता ही याच गोष्टीला कंटाळून दूसर्‍यागटात गेला बरेच दिवसांनपासून महिला अध्यक्ष व यूवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड अध्यक्ष यांचेत नाराजीचा सारीपाट सूरु असल्याने कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थिती लावली नाही सोबत असे ही समजते की एका कार्यकारणी सदस्याच्या जवळचे (वाॅर्डातले) जवळपास दोनडझन सदस्य कार्यकारणीत घेतले आहे हे इतरांना न पटल्याने वाद वाढला असल्याचे जानकरांचे म्हणने आहे. यावर लवकरात लवकर उपाय न शोधल्यास निवडनूक काळात पक्षाला याचा फटका सहन करावा लागू शकतो. केवळ एका इच्छूक उमेदवाराचे लाड पूरवायचे काम सूरू असल्याची राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) गटात चर्चा सूरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!