कलामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

शैक्षणिक परिसरातील सांस्कृतिक दहशतवाद व झुंडशाही तातडीने रोखा-आशिष

प्रतिनिधी पूणे दि. ०४ फेब्रुवारी २०२४ दोन दिवसांन पूर्वी ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आरएसएसच्या हिंदुत्ववादी झुंडीनी हल्ला करत गंभीर मारहाण केली. या हल्ल्याचा शहरातील विविध लोकशाहीवादी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. विडंबन, प्रहसन प्रकारातील सदर नाटकाचे सादरीकरण हा संबंधित विभागाच्या परिक्षेचा भाग होता. अशा प्रकारे परिक्षा सुरु असताना याच्याशी संबंधित नसणार्‍या झुंडी घुसतात, विद्यार्थ्यांवर हल्ला करतात, विभाग प्रमुखांना शिवीगाळ करतात हे गंभीर आहे. परिक्षा घेतली जाणे, त्याचे प्राध्यापकांतर्फे मुल्यमापन होणे हे विद्यापीठातील ज्ञानव्यव्हार आहेत. त्यातही जर झुंडी उतरून अशा प्रकारे हिंसाचार करत असतील तर ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एकूणच शिक्षण क्षेत्रास अपप्रतिष्ठा आणणारे आहे.
हा प्रकार अपवादात्मक नसून गेल्या काही काळात FTII सह इतरही शैक्षणिक संस्थांमध्ये याच प्रकारचे हल्ले केले गेले. धर्माच्या नावाखाली चाललेली ही झुंडशाही व सांस्कृतिक दहशतवाद संविधानविरोधी आहे. हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. असे संघटनेचे अध्यक्ष आशिष यांनी सांगीतले.
एखाद्या कलाकृती बद्दल कोणाला काही आक्षेप असल्यास ते संबंधित शैक्षणिक संस्थेच्या, विभागाच्या प्रमुखांकडे रीतसर आक्षेप नोंदवू शकतात. पोलिसांकडे ही याविषयीची तक्रार दाखल करू शकतात. या ऐवजी ज्याप्रकारे कायदा हातात घेऊन राजरोसपणे, दिवसाढवळ्या ही झुंडशाही चाललेली आहे ते गंभीर आहे. असे मत विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केले आहे.
अगदी मुली, महिला, दलित, आदिवासी विद्यार्थ्यांवर ही हल्ले केले जात आहेत. यातून कला क्षेत्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण तसेच वंचित घटकांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये, तसेच प्राध्यापकांमध्येही दहशत पसरत आहे. विद्यार्थी व प्राध्यापक यांना मुक्तपणे अध्यायन व अध्यापन करता येणारे सुरक्षित व आश्वासक वातावरण पुरवणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या प्रकारची झूंडशाही रोखणे व संबंधितांवर कडक कारवाई करुन कायदा व सुव्य्वस्था राखणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणूनच याबाबत विद्यापीठ व पोलिस प्रशासनाने खंबीर भूमिका घेऊन अभावीपा या संघटनेवर व हे कृत करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कार्यवाही करावी व अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आवश्यक ती पावले उचलावी असे आम्ही जाहीर आवाहन करतो. असे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI पुणे जिल्हा समितीच्या वतीने मागणी करण्यात आली यावेळी पी. यु. सी. एल. जन आंदोलनांचे राष्ट्रीय समन्वय, डी. वाय. एफ. आय. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, नव समाजवादी पर्याय या तीन संघटनांचे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!