महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा जयंती उत्सव पिंपरी-चिंचवड व पूण्यात साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० फेब्रूवारी २०२४ बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा जयंती उत्सव, काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना यांचे माध्यमातून, H. A. कॉलनी, मुंबई पुणे रोड, पिंपरी येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. बी. बी. शिंदे. रिपब्लिकन सेनेचे नेते मा. मुकुंद रणदिवे, मा. राजू गायकवाड, मा. घोबाले, इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेते मा. चंद्रकांत दादा लोंढे व सहकारी, तसेच सर्व हाराचे राज्य सचिव मा. हरीचंद्र शिंदे, सह सचिव मा. लक्ष्मण सिरसट, सह संघटक मा. रामभाऊ ओव्हाळ, दिलीप बनसोडे, तुकाराम सिरसाट, तसेच मातंग समाज समन्वय समितीचे व शिवशाही भीमशाही सामाजिक संघटनेचे कार्याध्यक्ष मा. युवराजभाऊ दाखले, मा. सागर ओव्हाळ, मा. परमेश्वर साहेब, मा. चव्हाण साहेब, इत्यादी अनेक पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे नेते, कार्यकर्ते, उपस्थित होते.

याच प्रमाणे पूणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय श्री. विनायकयजी लांबे यांच्या हस्ते शिवाजी नगर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी समाजवादी पार्टीचे शहर कार्यकारिणी सदस्य प्रशांत दांडेकर, इब्राहिम यवतमाळवाले तसेच समाजवादी पार्टीचे पुणे शहर व जिल्ह्याचे सरचिटणीस दत्ता पाकिरे हे उपस्थित होते.

तसेच नेहरूनगर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. कार्यक्षम नगरसेवक राहुल भाऊ भोसले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर वैशालीताई घोडेकर तसेच भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक मामा बनसोडे, शरद वाघमारे, शिवाजी सदाफुले, भिमशाही युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल सुरवसे, भिमशाही युवा संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रवीण धाईजे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष शिवा दळवी, उपाध्यक्ष संदीप वाघमारे, किरण आठवले, अनिल वाघमारे, शशी कुमार टोपे उपस्थित होते.
राहुल भाऊ भोसले व वैशालीताई घोडेकर यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे उद्घाघाटन करण्यात आले. यावेळी रिक्षा स्टँडच्या वतीने राहुलभाऊ भोसले व वैशालीताई घोडेकर, शिवशंकर उबाळे, अशोक मामा बनसोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!