महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
महापालिकेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन ..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ फेब्रुवारी २०२४ राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रारंभी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव, सोमनाथ शेळके, काकासाहेब शिंदे, निखिल दळवी, महादेव सुरवसे, बाळू वाघ, प्रमोद निकम, प्रशांत जोशी, गौरव वाळुंजकर, नवनाथ वाघ, संतोष भालेकर, कुमार दळवी आदी उपस्थित होते.