दरोडयातील आरोपी २४ तासात जेरबंद आळंदी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (आळंदी) दि. २३ फेब्रूवारी २०२४ फिर्यादी नामे रमेश विठठ्ल थोरवे वय ४३ वर्षे यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की दिनांक २२/०२/२०२४ रोजी रात्रौ ०२.३० वा ते ०३.०० वा चे दरम्यान त्यांचे राहते घरी मौजे च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता. खेड, जि. पुणे येथे कुटूबांसह झोपले असताना सदर वेळी ५ अनोळखी इसमांनी त्याचे घरात जबदरस्तीने घुसून फिर्यादी व त्यांची पत्नी सौ. आशा थोरवे व त्यांचे वडील विठठ्ल थोरवे यांना लोखंडी कोयता लोखंडी विळा यांचा धाक दाखवून घरातील सोने व रोख रक्कम असा एकूण ९७००० / रूपये किमतीचा माल दरोडा टाकून स्कॉर्पीओ वाहन क्र. एम. एच. ४२ / बी.जे. / ५५९६ ही मध्ये पळून गेले होते त्या बाबत आळंदी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क. ३९५, ४५२, ५०६,आर्म ॲक्ट ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर दाखल गुन्हयाचा तपास मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ श्री. डॉ. शिवाजी पवार साो, मा. सहा. पोलीस आयुक्त सो राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल गोडसे यांनी, डी.बी. पथकातील अंमलदार पो. हवा लोणकर बन ५०५, पो. ना. सानप ब न १९२१ पो.कॉ. खेडकर ब. न. १३०६ यांचे मदतीने आरोपीचा शोध घेतला असता दाखल गुन्हयातील पळून गेलेल्या आरोपीचा व स्कार्पिओ गाडीचा २ तासांत शोध घेवून दाखल गुन्हयाचे तपासकामी आरोपी नामे १ ) पृथ्वीराज सुखदेव चव्हाण वय २६ वर्षे रा. दापोडी, केडगाव ता. दौड जि पुणे २) कोहीनूर विशाल पवार वय २१ वर्षे रा. चोराची आळंदी ता. हवेली जि. पुणे ३) धिरज उत्तम चव्हाण वय ३५ वर्षे रा. दापोडी, केडगाव ता. दौंड जि. पुणे ४) नरेश धनजी सकीरा उर्फ हाकला वय २५ वर्षे रा. चोराची आळंदी ता. हवेली जि. पुणे यांना गुन्हयातील वापरलेली स्कॉर्पीओ वाहन कं. एम. एच. ४२ / बी. जे. / ५५९६ हीचेसह ताब्यात घेतले पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक लोहार करीत आहे.