छत्रपती शिवाजी महाराज, संत श्री सेवालाल महाराज आणि गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने थेरगाव येथे उत्साहात साजरी
प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी चिंचवड दि. २४ फेब्रूवारी २०२४ थेरगाव येथे ‘ब’ प्रभाग, ‘ड’ प्रभाग व ‘ग’ प्रभागातील सफाई कामगारांनी आपसात वर्गणी जमा करून शिवजयंती सेवालाल महाराज जयंती व गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती अगदी आनंदी वातावरणात साजरी केली,
थेरगाव पार्किंग येथील कामगार जयंती कमिटीचे यावर्षीचे अध्यक्ष जयचंद चव्हाण व सभासद अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून १५ फेब्रुवारीला सेवालाल महाराज जयंती १९ फेब्रुवारीला शिवजयंती व २३ तारखेला संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी केली.
२३ फेब्रुवारीला या तीनही महापुरुषांची जयंती उत्साहामध्ये धुमधडाक्यात साजरी केली या महापुरुषांच्या जयंती साजरी करत असताना कामगारांनी कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण केला नाही कामाच्या वेळेच्या अगोदर सकाळी सहा वाजता आरोग्य कर्मचारी तथा भिम शाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी या तीनही महापुरुषांची माहिती सांगून आपल्या कामातील प्रत्येकाचे कर्तव्य, जबाबदारी, दिलेल्या कामाचे सूचनाचे पालन करणे इत्यादी माहिती देऊन दोन्ही शिफ्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला शेवटी संविधानाच्या उद्देशिकेचे सर्वांनी वाचन केले.
या कार्यक्रमासाठी सर्वांची मदत झाली परंतु थेरगाव पार्किंग येथील सिक्युरिटी गार्ड यांची खूपच मोलाची मदत झाली. शेवटी सर्वांनी एक निर्णय घेतला की प्रत्येक महापुरुषाची जयंती आपण अगदी आनंदाने साजरी करूयात अध्यक्षांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.