महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांचा २८५ वा जयंती मोहोत्सव सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाजच्या वतिने साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ फेब्रूवारी २०२४ क्रांतिसिह सेवालाल महाराज हे भारतातील प्रमुख समाज सुधारक होते. शूर लढवय्या “गोरराज वंशीय बंजारा” समाजातील प्रख्यात सतगुरु होते, सेवालाल महाराज हे एक सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सुधारक होते. त्यावेळी असणारे महान संत हाथीराम बाबा, बाबा लखिशाह बंजारा, संत रूपसिह महाराज, क्रांतीकारी संत गोविंद गुरु बंजारा, यासह हा शूर वीर गोरराज वंशी बंजारा समुदाय, संत सेवालाल महाराजांना आपले आध्यत्मिक गुरु मानीत असत, ते जगदंबरचे परम शिष्य होते, ते आयुष्यभर ब्रम्हचारी राहिले.
रामावत क्षेत्रीय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते. आशा संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी, आंध्रप्रदेशा मधील अनंतपुर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोही गावांत झाला, आत्ता हे गावं सेवागड या नावाने ओळखले जाते.
अशा महान संतांचा २८५ वा जन्मोत्सव आज आपण साजरा करत आहोत, अशा महान अध्यात्मिक संतांच्या वैचारिक, आणि दृढनिश्चयी कार्यास कोटी कोटी अभिवादन! असे सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांनी बोलले.
पूढे सर्वांना संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देत संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांची पूर्ण माहिती देतांना ते बोलत होते की संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांचे जन्मस्थळ सुरा गोंदानाकोप्पा होते वडील भीमसिंह नायक तर आई धरमनीमाता ( धर्मनी याडी मातोश्री ) त्यांचे पूर्वाधिकारी कोणीही नाही. उत्तराधिकारी रामराव महाराज हे आहेत त्यांचे घराणे हे राजघराणे बंजारा गौर होते.
त्यांच्या आई धर्मनि याडी( मातोश्री ) या जयराम वडतीय (सुवर्णा कप्पा, कर्नाटक ) यांच्या कन्या होत्या. भीमा नायक व धर्मनी याडी यांना लग्नानंतर जवळ जवळ १२ वर्षे मुलबाळ झाले नव्हते, पुढे जगदंबा मातेच्या पूजे मुळे व कृपे मुळे त्यांना सेवालाल हे पुत्ररत्न लाभले. बंजारा ही संस्कृती तर गौर हा प्राचीन क्षेत्रीय वंश आहे. पूर्वीचे मूळ स्थान मेवाड आणि राजपुताना. मोहम्मद घोरीच्या आक्रमणा नंतर राजपुतांचे जनजीवन विस्कळीत झाले, राजा महाराणा प्रताप बरोबर यातील गौर बंजारा टोळ्या जंगलात गेल्या, गौर बंजारा समाजासाठी “गौर माटी” असाही एक शब्द प्रयोग केला जातो. “मातीशी जुळलेला माणूस ” “मातीशी नातं ठेवणारा माणूस ” म्हणजेच गौरमाटी होय. वैदिकांनी अनेक बाबतीत यांना त्रास दिला, कारण या व्यवस्थेतील संतांचे कार्य वैदिकास पसंत नसे, कारण संत हे सामाजिक व्यवस्थेतील सुधारणा वादी होते, तर वैदिक हे रूढी परंपरा, विषमता वादी असत आणि आहेत, हे आजही आपल्या दृष्टीसमोर आहेच, म्हणून या देशातील सर्वच संत महात्म्याचा वैदिकांनी केवळ छळच केलेला आहे. हे मनूस्मृतीतून आपणास दिसून येते.
संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण
१) जंगल आणि पर्यावरण याचे रक्षण करा.
२) कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नका.
३) इतरांशी वाईट बोलू नका, इतरांना इजा करु नका.
४) सन्मानाने आपले आयुष्य जगा, आणि इतरांना जगू द्या.
५) स्त्रियांचा सन्मान करा आणि मुली जिवंत देवी आहेत असे समजा.
६) काळजी करु नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्यावे.
७) पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्याना पाणी पुरवठा करा, आणि कधीही पाणी विकण्यास स्वतःस गुंतवू नका. हे सर्वात मोठे पाप व गुन्हा आहे.
८) वडीलधारी माणसांचा आदर करा, आणि तरुणावर प्रेम करा. तसेच प्राण्यांचा देखील आदर करा.
९) जंगल कधीही तोडू नका, जर जंगल नष्ट केले तर, आपण स्वतः ला नष्ट करीत आहात.
१०) मनन केल्याने शारीरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा तसेच इतरांना ज्ञान वाटा.
११) माणुसकीवर प्रेम करा,
१२) आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धा युक्त विश्वास टाळा.
१३) कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या, आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.
धर्म मानवतेच्या शिस्त, चिंतलशील आणि एक बुद्धी प्रामाण्यवादी संत होते, अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदता म्हणून आजीवन त्यांनी भूमिका केली. संत सेवालाल महाराज हे दूर दृष्टीचे होते हे त्याची वचने पहाता दिसून येते.
संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांची काही वचने
१) एक रुपयाला एक वाटी पाणी विकेल.
२) खाटकाला गाय विकू नका, पशू प्राण्यावर प्रेम करा.
३) नवरा जिवंत असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका.
४) चोरी करुन, खोट बोलून, पैसा कमवू नका. किंवा तसा पैसा घरात आणू नका.
५) कोणाची निंदा, चहाडी, चुगली, लावा लावी करु नका.
६) जाणून घ्या, विचार मंथन करा, नंतरच ती गोष्ट स्वीकारा.
या गोष्टीचा जो कोणी आदर करेल, आचरणात आणेल, स्वीकार करेल, मी त्यांचे रक्षण करेल, पाना आड पान मी त्याला तारेल. असे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज आपल्या वचनांतून सांगत असत. महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात संत सेवालाल महाराजांची जयंती शासन स्तरावर साजरी होते. अशा या संत सेवालाल महाराजांचा मृत्यू ४ जानेवारी १७७३ रोजी, रुईगड, यवतमाळ जिल्ह्यात, महाराष्ट्रात झाला. संत सेवालाल महाराजांची समाधी, महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्यातील, पोहरागड येथे जगदंबेच्या मंदिरा शेजारी आहे. अशा समाज परिवर्तन विचार धारेतील महान संत सेवालाल महाराज यांच्या विचारला व कार्याला कोटी कोटी अभिवादन, या वेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!