सातारा जिल्हा कराड तालुक्यात आहेत १०८ बूद्ध लेण्या..
प्रतिनिधी सातारा दि. २६ फेब्रूवारी २०२४ सातारा जिल्हा कराड तालुक्यातील आगाशिवनगर, जखीणवाडी, चचेगाव या डोंगरदर्यांमध्ये १०८ बूद्ध लेण्या आहेत,
त्यातील सध्या ३५ लेण्या अस्तित्वात आहेत, २ दिवसापूर्वी चचेगाव येथील डोंगर दरीमध्ये बुद्धलेणी सापडली असता कराड येथील बौद्धबांधव व लेणी संवर्धकांनी ही लेणी पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली, व लेणी संवर्धनासाठी मोहीम आखूण आगाशिवनगर कराड येथे फूले आंबेडकर प्रतिष्ठान कराड यांच्यावतीने संवर्धन मोहीम आयोजीत करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ व पूणे, कराड, सातारा, कोल्हापूर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातून लेणी संवर्धकांनी या लेण्यांना भेट देऊन अवतीभोंवती असलेली झूडपे तोडून लेणी मधील गाळ काढण्यात आला, गाळ काढत असताना लेणीमध्ये भव्य वोटीव स्तूप सापडला असल्याचे एकजूट लेणी अभ्यास प्रचारक दादूस डोळस यांनी सांगीतले.
हा परिसर स्वच्छ करून कोंडलेल्या लेणीला मोकळा श्वास देण्यात आल्याने उपस्थितांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर लेणीवरती चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या फोटोला पुष्पहार घालून बूद्धवंदना घेण्यात आली,
यावेळी संस्थेचे स्वप्नील जाधव, किरण गायकवाड, शुभम कांबळे, प्रदीप सातपुते, योगेश किरवेकर, मोहिंदर लिगाडे, मंदा सोनताठे, विनोद कांबळे, सुकन्या गाडे, व फुले आंबेडकर प्रतिष्ठान कराड व कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघाचे सर्व पदाधिकारी, व लेणी संवर्धक उपस्थित होते.