अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
पिपंळे सौदागर येथील लोटस हॅास्पीटल समोरील MSEB च्या फिडर बाँक्सला लागली आग..
प्रतिनिधी पिॅंपरी चिंचवड दि. ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता पिपंळे सौदागर येथील शिवसाई लेन रस्तावरील लोटस हॅास्पीटल समोर असणार्या MSEB च्या फिडर बाँक्सला आग लागली होती, ही बाब तेथे काम करत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कर्मचारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरीत ही घटना मा. नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यानां सपंर्क करून कळवली, व नाना काटे यांनी MSEB चे उपअभियंता श्री. ननवरे सर यांना फोन करून या घटनेची माहीती दिली व त्वरीत या फिडर बाँक्स वरील विद्युत सप्लाय बंद करण्यास सांगितले, व अग्निशामक विभागाला देखील फोन करून कळविले, अग्निशामक व महावितरणचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवले व पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली.