गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

मंगल केंद्र मालकांची भांडी पळवणाऱ्या टोळीचा दिघी पोलिसांनी केला पर्दाफाश..

प्रतिनिधी (दिघी) पिंपरी चिंचवड दि. ०६ मार्च २०२४ बाळाच्या वाढदिवसाचे कार्यक्रमासाठी भांडी लागतात असे खोटे सांगून पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण परिसरातील वेगवेगळ्या मंगल केंद्र मालकांचा विश्वास संपादन करून भांडी परत न करता त्यांची फसवणूक करणार्‍या टोळीचा दिघी पोलीस ठाणे कडून पर्दाफाश करुन त्यांचेकडून एकूण ६,४०,७८०/- रू. किमतीचा माल जप्त करून एकूण चार गुन्हे उघड केले. दि. २५/०२/२०२४ रोजी दुपारी १४.०० वाजण्याचे सुमारास अक्षदा मंगल केंद्र, स. नं. ७३, आदर्शनगर, पंचशिल कॉलनी, दिघी, ता. हवेली, जि. पुणे येथील मंगल केंद्र मालक यांचे दुकानातील ३९७८०/- रू. किंमतीची वेगवेगळी भांडी विनोद सुर्यवंशी नावाचा इसम व त्याचे सोबत असणारे तीन इसम व एक महिला यांनी बाळाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी भांडी लागतात असे खोटे सांगून केंद्र मालकांचा विश्वास संपादन करून भांडी घेवून जावून ते परत केली नव्हती. त्यावर अक्षदा मंगल केंद्र मालक नमूद इसमांचा शोध घेत असता त्यांना भोसरी, देहूरोड, चिखली या मंगल केंद्र मालकांकडून माहिती मिळाली की, विनोद सूर्यवंशी नावाचे इसमाने व त्याचे सोबतच्या टोळीने अशाच प्रकारे अनेक मंगल केंद्र मालक यांची फसवणूक केली आहे. त्याबाबत सदर टोळीचा शोध घेत फिर्यादी व इतर केंद्र मालक दिघी पोलीस ठाणे येथे आले असता अक्षदा मंगल केंद्र मालक यांची दिघी पोलीस ठाणे येथे तक्रार घेवून दि.०३ मार्च २०२४ रोजी आरोपीं विरुध्द दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ९३/२०२४ भादवि कलम ४२०,४१९, ४०६, ३४ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिघी पोलीस ठाणेचे गुन्हे तपास पथकातील सपोनि अंभोरे, पोहवा १०२० कांबळे, पोशि २८२८ काकडे, पोशि ३५५३ कसबे, पोशि ३०६३ खळसोडे व मपोशि ३७७२ गोरड यांनी इतर प्राप्त माहितीनुसार व अक्षदा मंगल केंद्र दिघी येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अक्षदा मंगल केंद्र मालक मंगल केंद्र मालक यांचे मदतीने आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे १) विनोद लक्ष्मण सुर्यवंशी ऊर्फ चैतन्य पाडुरंग चौधर, वय २१ वर्षे, रा. निपानी जळगांव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर २) तुळशीराम निवृत्ती फुंडे, वय ६४ वर्षे, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदगनर ३) अनिषा देविदास फुंडे, वय २५ वर्षे, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदगनर यांना दि. ३/३/२०२४ रोजी अटक केली. अटक आरोपींची पोलीस कस्टडी मिळालेनंतर त्यांचेकडून एकूण ६,४०,७८०/- रू. किंमतीची वेगवेगळी भांडी तसेच दोन मोबाईल तसेच एक फोरव्हिलर कार व टुव्हिलर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच तपासात अटक आरोपीची टोळी असून त्यांनी आपले पाहिजे असलेल्या साथीदारांसह इतर मंगल
केंद्र मालकांची सुध्दा अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघडकीस आले. सदर बाबत सदस्थितीत १) खेड पोस्टे पुणे ग्रामीण गु.र.नं. १४७/२०२४ भादवि क. ४२०, ४०६, ४१९, ३४ २) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.र.नं. १२४/२०२४ भादवि क. ४०६, ४२०३) शिरुर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गु.र.नं. १९५/२०२४ भादवि क. ४२०,४०६,३४४) देहूरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.र.नं. १००/२०२४ भादवि क. ४२०, ४१९, ४०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सूरू असून उर्वरीत फरार आरोपींचा शोध सूरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप-अयुक्त सो परीमंडळ ०३, डॉ. शिवाजी पवार सो, तसेच मा. सहा पोलीस आयुक्त सो भोसरी एमआयडीसी विभाग, श्री. राजेंद्रसिह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील व सहा. पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, पोलीस हवा १०२० कांबळे, पोशि २८२८ काकडे, पोशि ३५५३ कसबे तसेच पोशि ३०६३ खळसोडे, मपोशि ३७७२ गोरड व पोहवा राजू जाधव नेमणुक परिमंडळ- ०३, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.
टीप :- अशा प्रकारे मंगल केंद्र मालकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे संपर्क करावा. ( दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड फोन नं. २०-२९९५०४४७ )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!