प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ मार्च २०२४ मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये (०५%) पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी अल्पसंख्याक विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांच्या नेतृत्वामध्ये मागील सात दिवसापासून भीमसृष्टी पिंपरी येथे साखळी उपोषण सूरू आहे. या उपोषणाला आज भिमशाही युवा संघटना व सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. बी. बी. शिंदे, भिमशाही युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन कसबे, सर्व हाराचे राज्य सचिव मा. हरीचंद्र शिंदे, भिमशाही युवा संघटना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रवीण धाईजे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल सुरवसे, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे सह सचिव मा. लक्ष्मण सिरसट, सह संघटक मा. रामभाऊ ओव्हाळ, दिलीप बनसोडे, तुकाराम सिरसाट इतर कार्यकर्ते उपस्थित होते.