गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपवड पोलीस आयुक्तांची कारवाई एका PSI चे निलंबन तर दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ मार्च २०२४, ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे ४४ किलो ७९० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकला निलंबित करण्यात आले आहे. तसेच देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
पिंपळे निलख मधील रक्षक चौकात हॉटेल कामगाराकडे दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन हे अमली पदार्थ सापडल्या नंतर तपासांती त्याने दिलेल्या माहिती नूसार या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली होती. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाला गांजा जवळ बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांना धमकावून पाच लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणातील पोलीस कर्मचारी सचिन शेजळ आणि हेमंत गायकवाड यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!