गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून..

विषेश प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ मार्च २०२४ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाचा काल मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी असे या २३ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विकासनगर किवळे भागात असलेल्या श्री. साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञात लोकांनी विशालची दगडाने ठेचून हत्या केली असल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास नगर येथे मध्यरात्री ०१ वाजण्याच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर त्याच परिसरातील चार ते पाच तरुणांची जीवघेणा हल्ला केला. विशालला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर दगड लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला असल्याचे समजते. विशालच्या डोक्यामध्ये व तोंडावर झाडाची कुंडी, सिमेंटचा गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून त्याला जीवे मारले असल्याचे सांगण्यात येते. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पूढील तपास सूरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!