क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

प्रेमलोक पार्क येथील उद्यानात ओपन जिम बसवण्यात यावी. माधव पाटील

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ मार्च २०२४ गेली दोन वर्षे प्रशासनामार्फत पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा कारभार चालू आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांनी कामे सांगायची कुणाला असा प्रश्न शहरभर सर्वच लोकांना पडत आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी प्रेमलोक पार्क येथील उद्यानात ओपन जीमची उपकरणे आणि कॅमेरे बसवावेत असे माधव पाटील यांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी समाज माध्यमाद्वारे माननीय आयुक्त शेखर सिंह यांना प्रेमलोक पार्क येथील वीर सावरकर उद्यानात ओपन जिम आणि कॅमेरे बसवण्याचे निवेदन दिले.
या निवेदना द्वारे ज्येष्ठ नागरिकांना व्यायामा करीता सूविधा होईल व क्रिडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही या ओपन जिमची मदत होईल. असे माधव पाटील यांनी निवेदना द्वारे आयूक्तांना कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!