उत्सवमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छासामाजिक

“सागरी भूमिपुत्र महासंघ” स्थापना दिन सोहळा संपन्न!..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०१ ऑक्टोबर २०२६ राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदारांच्या ‘सागरी भूमिपुत्र महासंघ’ स्थापना सोहळा अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात पार पडला. 

या सोहळ्यास परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांची आशीर्वाद रुपी विशेष उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांची होती; परंतु काही कारणास्तव त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य न झाल्याने त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपली उपस्थिती दर्शवून सर्वांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाला पद्मश्री लक्ष्मण माने साहेब (विशेष उपस्थिती) आणि पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा साहेब (विशेष सागरी रत्न पुरस्कार) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सर्व भूमिपुत्रांच्या न्याय व हक्कासाठी आणि संघटित प्रगतीसाठी ही चळवळ नव्या दमाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी मिळून केला आहे!
उपस्थित राहिलेल्या सर्व भूमिपुत्रांचे, स्नेहीजनांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button