सा.लो. आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णीकृती स्मारकास दुग्धाअभिषेक करून अमरण उपोषणास सुरुवात..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ डिसेंबर २०२४ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडीतील स्मारकाला मेट्रोच्या कामकाजामुळे तडे गेलेले असल्याकारणाने तसेच बी. आर. टी. प्रशासनानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन त्या ठिकाणी नाम फलक लावण्यात आला होता.
परंतु मेट्रो प्रशासनानं त्या नामफलकाची तोडफोड करून भंगारात टाकून त्या नावाचा विडंबन केल्याच्या निषेधार्थ शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष अरूण जोगदंड, मंगेश डाखोरे व इतर समाज बांधव अमरण उपोषणासाठी निगडी या ठिकाणी बसलेले आहेत.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकास दुग्ध अभिषेक करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष संजय ससाणे, जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, डी. पी. खंडाळे, लोकसेवक युवराज दाखले, शिवाजीराव खडसे , गणेश कलवले, मारूती जाधव, अनिल तांबे, शिवाजीराव साळवे, अनिल तांबे, अविनाश कांबीकर, अमोल लोंढे, लक्ष्मण वैरागे, विक्रम गायकवाड, अक्षय पौळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.