प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१३ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महापालिका व समाज कल्याण विकास केंद्र यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. त्यामध्ये पिंपरी चिंचवड मधून उद्योजिका पुरस्कार देवून सौ. आशाताई इंगळे यांना आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
भरारी महिला फाउंडेशनच्या अंतर्गत महिला बचत गटांना घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी संकल्पना मांडण्यात आली या संकल्पनेचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्षातील प्रत्येक दिवस हा महिलेचाच असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक महिलेचा दिवस असतो. पुरूषाप्रमाणे महिलेच्याही खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते. सकाळी उठल्यापासून जेवणाचा डबा करण्यापासून ते रात्री मुलाबाळांना झोपवण्यापर्यंत संपुर्ण घर महिला सांभाळत असते. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज सर्वतोपरी कार्ये करु शकते कारण आजची महिला सक्षम आहे. ती रणरागिनी आहे, ती देश चालवू शकते, ती विमान चालवू शकते, ती रिक्षा चालवू शकते, उद्योजक बनू शकते, अधिकारी बनू शकते, राजकारणात उतरू शकते अशी सगळ्या प्रकारची कामे महिला अगदी जबाबदारीने पार पाडू शकते, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.
टीप :- यात महिलांना एकही रूपयाचा खर्च न करता क्लाऊड किचनची सूरूवात करून दिली जाते.