हॉकी बंगालचे गुजरातवर २८ गोल; मध्य प्रदेशची विजयी सुरुवात..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ मार्च २०२४ गतविजेता हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीवर ८-० अशी मात करताना १४व्या हॉकी इंडिया सीनियर महिलांची राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सुरुवात केली आणि स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. हॉकी बंगालने गुजरातचा २८-० असा धुव्वा उडवला. झारखंड, कर्नाटकनेही विजयी सलामी दिली.
नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू झालेल्या स्पर्धेत हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशला १३-० असे हरवले. तामिळनाडूने तेलंगण हॉकीवर २-० अशी मात केली. हॉकी कर्नाटकने हॉकी उत्तराखंडला ६-० असे रोखले.
पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यात ए गटातील हॉकी मध्य प्रदेशने हृतिका सिंगच्या चार गोलच्या छत्तीसगड हॉकीला ८-० असे पराभूत केले. हृतिकाने ११व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रुपांतर करून गोलखाते उघडले. त्यानंतर १७व्या, २२व्या आणि ३३व्या मिनिटाला गोल करताना गोलचौकार पूर्ण केला. मध्यंतराला ४-० अशी आघाडी घेणार्या हॉकी मध्य प्रदेशने उत्तरार्धात आणखी तितक्याच गोलांची भर घातली. प्रीती दुबे (२४व्या मिनिटाला), ऐश्वर्या चव्हाण (४६व्या मिनिटाला), अंजली गौतम (४८व्या मिनिटाला) आणि साधना सेंगरने (५७व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला.
सी गटात हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशवर १३-० असा सहज विजय मिळवला. त्यात आठ खेळाडूंच्या गोलचा समावेश आहे. संगीता कुमारीचे (२४, ५४, ५७ आणि ६०व्या मिनिटाला) सर्वाधिक चार गोल आहेत. महिमा टेटेने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्यानंतर, दीपिका सोरेंग (१८ आणि ३५व्या मिनिटाला), दीप्ती टोप्पो (२४व्या मिनिटाला, ३२ व्या मिनिटाला) तसेच सलीमा टेटे (२५व्या), रजनी केरकेट्टा (३५व्या मिनिटाला), दिप्ती कुल्लू (३८व्या मिनिटाला) आणि निक्की कुल्लू (३९व्या मिनिटाला) यांचा समावेश आहे.
तिसरा सामना एकतर्फी झाला. एच गटात हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा २८-० असा धुव्वा उडवताना दिवसातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. होरो संजनाने (१२, २०, ३४, ४७, ४७, ५३, ५४, ५४ मिनिटाला) तब्बल आठ गोल करताना त्यात सर्वाधिक वाटा उचलला. सुष्मिता पन्ना हिने (१३, २१, ३६, ५५, ५७व्या मिनिटाला) पाच आणि मॅक्सिमा टोप्पो हिने (२४, २८, ४४ आणि ५८व्या मिनिटाला) चार गोल करताना तिला सुरेख साथ दिली. मोनिका नाग हिने (०७ आणि १५व्या मिनिटाला) पहिला गोल केला. सुश्मिता गंधाने (२३ आणि ५५व्या मिनिटाला), लिली ओरम (३२, ३२ आणि ४५व्या मिनिटाला), कविता (४० आणि ५९व्या), निधी साहनी (४१व्या मिनिटाला) आणि अंजना डुंगडुंग (४९व्या मिनिटाला) यांनीही विजयाला हातभार लावला.
एच गटातील सामन्यात, तामिळनाडू हॉकी युनिटला तेलंगण हॉकीने २-१ असे झुंजवलेे. सोनिया एस हिने २३व्या मिनिटाला पहिला गोल केला. तेलंगणकडून वर्शिथा मुप्पाला (३९व्या) हिने बरोबरी साधून दिली. मात्र, सोनियाने ५१व्या मिनिटाला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करताना तामिळनाडूला जिंकून दिले.
निकाल –
ए गट: हॉकी मध्य प्रदेश: ८(हृतिका सिंग ११व्या मिनिटाला पीसी.; १७व्या, २२, ३३व्या; प्रीती दुबे २४व्या, ऐश्वर्या चव्हाण ४६व्या; अंजली गौतम ४८व्या पी.सी. साधना सेंगर ५७व्या मिनिटाला) विजयी वि. छत्तीसगड हॉकी ०: हाफटाईम: ४-०
क गट: हॉकी झारखंड: १३ (महिमा टेटे चौथ्या मिनिटाला, पीसी; दीपिका सोरेंग १८, ३५व्या मिनिटाला; दिप्ती टोप्पो २४व्या मिनिटाला पीसी., ३२ पीएस; संगीता कुमारी २४व्या, ५४व्या, ५७व्या, ६०व्या मिनिटाला; सलीमा टेटे २५व्या, रजनी केरकेट्टा ३५व्या मिनिटाला पीसी, दिप्ती कुल्लू ३८व्या मिनिटाला; निक्की कुल्लू ३९व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी आंध्र प्रदेश ०: हाफटाईम: ५-०
एच गट : हॉकी बंगाल: २८ (मोनिका नाग ७व्या, १५व्या; होरो संजना १२, २०, ३४, ४७, ४७, ५३, ५४, ५४व्या मिनिटाला; सुष्मिता पन्ना १३, २१, ३६, ५५, ५७व्या व्या मिनिटाला; सुष्मिता गांधा २३ आणि ५५व्या मिनिटाला पीसी; मॅक्सिमा टोप्पो २४व्या मिनिटाला पीसी, २८, ४४, ५८व्या मिनिटाला; लिली ओरम ३२, ३२, ४५व्या मिनिटाला; कविता ४०व्या मिनिटाला पीसी आणि ५९व्या मिनिटाला; निधी साहनी ४१व्या मिनिटाला; अंजना डुंगडुंग ४९व्या मिनिटाला पीसी) विजयी वि. गुजरात ०: हाफटाईम ९-०.
एच गट: हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू: २ (सोनिया एस २३व्या, ५१व्या मिनिटाला) विजयी वि. तेलंगणा हॉकी: १ (वर्षिथा मुप्पाला ३९व्या मिनिटाला). हाफटाईम: १-०
जी गट : हॉकी कर्नाटक: ६ (कृतिका एसपी सातव्या मिनिटाला, ३४व्या मिनिटाला पीसी, एमजी याशिका आठव्या, बीएन पुजिता २२व्या मिनिटाला; चंदना २३व्या मिनिटाला, अंजली एचआर ४८व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी उत्तराखंड: ०. हाफटाईम: ४-०.
CAPTIONS
M1 – Madhya Pradesh (Red) vs Chhattisgarh (White)
M2 – Jharkhand (Blue) vs Andhra Pradesh (Orange)
M3 – Bengal (White) vs Gujarat (Orange)
M4 – Tamil Nadu (Red) vs Telangana (Blue)
M5 – Karnataka v Uttrakhand