प्रतिनिधी पूणे दि. १४ मार्च २०२४ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.या पूर्वी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसेला राजीनामा दिला. त्यानंतर, ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यलयात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे त्यावेळी दोघांन पैकी कोण कोण असतील शरद पवारांन सोबत हे स्पष्ट होईल.