प्रतिनिधी पूणे दि. १४ मार्च २०२४ निलेश लंके यांनी पूस्तकाच्या उद्घाटन निमित्त पूण्यात शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले होते त्यावेळी लंके यांनी लिहिलेल्या पूस्तकाचे अनावरण होणार होते. तत्पूर्वी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली यात निलेश लंकेंनी शरद पवार गटात सामिल होत तूतारी वाजवत खासदारकी लढवत आहे असे सांगीतले.
या पूर्वी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसेला राजीनामा दिला होता. त्यानंतर, ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यलयात दाखल झाले होते. परंतू जयंत पाटलांनसोबत निवडून येण्याची शाश्वती या विषयावर बोलून ते बाहेर निघून गेले. वसंत मोरे यांचे सदर्भात सध्या तरी काही ठरले नाही असे समजते.
शह की प्रतिशह .. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी दि.१४ मार्च २०२४ रोजी जाहीर केली. या यादीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. सुजय विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, विखेंविरोधात तगडा उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. सुजय विखेंविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंच्या मागे जनसमूदाय उभा राहू शकतो. शिवाय त्यांच्या संपर्काचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार गट निलेश लंकेंना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.
यात कोण बाजी मारेल हे पाहण्यासारखे असेल.