गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

बनावट लिक्वीड तयार करून विक्री करणारी टोळी गजाआड. १५,१५,६७८/- रू चा बनावट मुददेमाल जप्त..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ मार्च २०२४ दिनांक १०/०३/२०२४ रोजी कॉपीराईट अधिकारी नामे अशरफुददीन फयाजुददीन इनामदार वय ४० वर्षे धंदा नोकरी (मॅनेजर) रा. स.न. ३० / १/३/ १ शास्त्रीनगर दत्त मंदीर जवळ, रहाटणी पुणे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ११९ / २०२४ भा.द.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ कॉपी राईट ॲक्ट १९७७ कलम ६३,६५ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हयात आरोपी नामे १) भावेश लक्ष्मण पटेल वय ५८ वर्षे रा. पोस्ट – तोरनिया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात सध्या रा. हाई टेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी पुणे २) अन्वर भचुभाई खलिफा वय ३० वर्षे रा. पोस्ट लाकडीया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात सध्या रा. हाई टेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून हाईटेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी पुणे ३९ येथील गोडावून मधून २,२२,४५६/- रूचा रेकिट बेंकीझर या कंपनीचे हार्पिक, लाईजॉल, कॉलीन व गुड नाईट या मुळ कंपनीच्या मालाशी साध्यर्म्य असलेला माल हस्तगत करण्यात आला असून यातील आरोपी नामे भावेश पटेल याचे मार्फतीने निष्पन्न आरोपी नामे मंजी हरि भासडीया वय ४१ वर्षे रा. रुम नं. ६०२, साई पुजा बिल्डींग, प्लॉट नंबर ६७ सेक्टर ३५ कामोठा यास दिनांक ११/०३/२०२४ रोजी रोजी १३/३० वा ताब्यात घेवून दाखल गुन्हयाबाबत तपासाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने स.नं. ७६ काम व्हेअर हाऊस न्यू एकता वजन काटयाजवळ शॉप नं.४ ठाणे येथे एक गोडाऊन वजा कंपनीमध्ये त्याने या गुन्हयातील बनावट हार्पिक व इतर कंपन्याचा कि.रु. १२,९३,२२२/- चा बनावट मुददेमाल तयार केला असून तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) भावेश लक्ष्मण पटेल वय ५८ वर्षे रा. पोस्ट तोरनिया ता. बच्चाऊ जि. राज्य गुजरात सध्या रा. हाई टेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी पुणे २) अन्वर भचुभाई खलिफा वय ३० वर्षे रा. पोस्ट लाकडीया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात सध्या रा. हाई टेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी पुणे ३) मंजी हरि भासडीया वय ४१ वर्षे रा. रुम नं. ६०२ साई पुजा बिल्डींग, प्लॉट नंबर ६७ सेक्टर ३५ कामोठा यांचेकडून एकूण १५,१५,६७८/- रू किंमतीचा बनावट मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. श्री बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, सहा पोलीस आयुक्त मा. श्री. सतीश माने, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!