गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

दिघी पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरणार्‍या आरोपीकडून एकूण २,८०,०००/- रू कि. च्या एकूण चार मोटार सायकल जप्त करून चार गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२६ मार्च २०२४ दिघी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मोटार सायकल गुन्हयाबाबत मा. वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. दिघी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे आदेशाप्रमाणे ता. २५/०३/२०२४ रोजी धुलीवंदन सणानिमित्त तपास पथकातील नितीन अंभोरे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवा ब. नं. १५७२ जाधव, पोलीस हवा ब. नं. १०२० कांबळे, पोलीस शिपाई ब. नं. २०९४ जाधव असे दिघी परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक मोटार सायकलवर दोन इसम संशयितरित्या जात असताना दिसले नंतर त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांना पाहून मोटार सायलवरून पळू लागले म्हणून वरील तपास पथकाला संशय आल्याने त्यांनी सदर मोटार सायकलचा पाठलाग करून संशयित दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यातील एकाचे नांव १) संतोष जयहिंद्र गुप्ता, वय १९ वर्षे, रा. शिंदे चाळ, खंडोबामाळ, भोसरी, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले तसेच दुसरा इसम विधी संषर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता ते मोटार सायकल चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी दिघी पोलीस ठाणे येथील तीन मोटार सायकल व चाकण पोलीस ठाणे येथील एक मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली, त्याप्रमाणे त्यांचेकडून चार मोटार सायकल हस्तगत करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत.
१) दिघी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड गु. रजि नं. ५४ / २०२४ भा. द. वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली ७०,०००/- रू. कि. ची एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची ॲक्टीव्हा ६ जी मोपेड दूचाकी तिचा नं. एम.एच- १४- जे.के. -१४१२
२) दिघी पोलीस ठाणे गु. रजि नं. १३१ / २०२४ भा. द. वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली ७०,०००/- रू होंडा सीबी शाईन काळया रंगाची मोटार सायकल नं. एम एच २४ – बी. डी-७२७८
३) दिघी पोलीस ठाणे गु. रजि नं. १३२/२०२४ भा. द. वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली ५०,०००/- रू. कि. ची होंडा सीबी ट्रीगर लाल रंगाची मोटार सायकल नं. एम.एच-१४ ई. जी- २२९७
४) चाकण पोलीस ठाणे गु. रजि नं. ११०५/ २०२३ भा. द. वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली ९०,०००/- रू कि. ची एक काळया रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटार सायकल नं. एम.एच -१४-जे. जे. ५८७९
अशा एकूण २,८०,०००/- रू कि. च्या एकूण चार मोटार सायकल जप्त करून दिघी पोलीस ठाणे येथील तीन गुन्हे व चाकण पोलीस ठाणे येथील एक गुन्हा उघडकीस केले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री वसंत परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. शिवाजी पवार साो, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, पिपरी चिंचवड तसेच मा. श्री सचिन हिरे, सहा पोलीस आयुक्त सो भोसरी एमआयडीसी विभाग, पिंपरी चिंचवड, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री विजय ढमाळ सो., वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे व दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील नितीन अंभोरे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवा ब. नं. ८०१ पोटे, पोलीस हवा ब. नं. १०२० पोशि ब. नं. कांबळे, पोलीस हवा ब. नं. १५७२ जाधव, पोशि ब. नं. २०९४ जाधव, पोशि ब. नं. २८२८ काकडे, ३३९१ भोसले, पोशि ब. नं. ३४९२ कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!