प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २७ ऑगस्ट २०२४ खड्डे युक्त दत्तक नाशिक स्मार्ट सिटीने विकासकामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने येणाऱ्या गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे.
शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसुन येते. त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नाशिक महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार तसेच नाशिक दत्तक घेण्याच्या बाता करणाऱ्या दत्तक पिताला नाशिक शहराचा पडलेला विसर याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनहित कक्ष विधि विभागातर्फे प्रशासनाचा तसेच दत्तक पित्याचा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात प्रतीकात्मक दहीहंडी फोडून निषेध करण्यात आला. तसेच येणाऱ्या पाच दिवसात नासिक शहर हे खड्डे मुक्त नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरामध्ये मोठ्या स्वरूपात जन आंदोलन उभे करण्यात येईल यावेळी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींना नाशिक महानगरपालिका प्रशासन तसेच दत्तक पिता जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे प्रशासनाला ठनकावून सांगण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे मा. जिल्हाध्यक्ष मनसे, दिलीप दत्तु दातीर सभागृह नेते मनपा, जिल्हा उपप्रमुख मनोज घोडके, जिल्हाध्यक्ष जनहित प्रफुल बनबेरू, जिल्हाध्यक्ष रस्त्या स्थापना अमित गांगुर्डे, जनहित शहराध्यक्ष सौरभ खैरनार, अक्षय खांडरे, रोहन जगताप, महिंद्रा डहाळे, तेजस वाघ, रोहित शिंदे, स्वप्नील दहीकर, राजु शिंदे, रोहित वैद्य, आकाश ठाकरे, पंकज दुसाने, नितीन अहिरराव आदींसह मोठ्या स्वरूपात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.