प्रतिनिधी सातारा, कराड दि. ११ सप्टेंबर २०२४ बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य, मूर्ती आणि संशोधन संस्था छत्रपती संभाजी नगर शाखा कोल्हापूर, व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०८ सप्टेंबर २०२४ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील जखिनवाडी बुद्ध लेणी येथे एक दिवशी अभ्यास दौरा /धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्ध वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील डॉ. संतोष भोसले सर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व लेण्यांची माहिती राजू भालेराव यांनी दिली व सूत्रसंचालन मनोज गजभार यांनी केले प्रा. सुजाताई नवघरे यांनी लेणी संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. कैलास कांबळे यांनी आगाशिव पर्वत रांगेतील सर्व लेणी समूहांविषयी माहिती दिली व बोधिसत्व चैनलचे संचालक सागर कांबळे यांनी जखिन वाडी लेणी समूहाविषयी विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संतोष भोसले यांनी कार्यक्रमाचा आढावा सादर केला.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी रवी कांबळे, महायान मसुरे, राम भंडारे, ॲड. अशोक बडेकर, राहुल कांबळे, प्रियाताई शेख, मंदाकिनीताई गायकवाड, यांनी विशेष प्रयत्न केले व कार्यक्रमास प्रमोद गायकवाड, विजय पडघन, सुरज सोनकांबळे, बापूसाहेब राजहंस, प्रदीप पाटील, दीपक कांबळे, संदेश कांबळे, अजित कांबळे, प्रवीण वाघमारे, किशोर थोरवडे, आनंदा कांबळे, विकास, सुभाष, नाथभजन, सुभाष जाधव, उमाताई कांबळे, संगीता ताई भंडारे, करुणाताई गजभार, मंगलाताई कांबळे, शताब्दी विहार महिला संघाच्या (रेंजहिल्स रहिवासी सभा) सचिव वनिता कांबळे व खजिनदार सुरेखा खैरे प्रथमच लेणी मुक्ती आंदोलन समिती टिम सोबत उपस्थित होत्या “मारा फेर फटका ग्रुप”चे प्रसिद्ध ट्रेकर्स किरण कांबळे सह राज्यातील १५० पेक्षाही जास्त लेणी प्रेमी उपस्थित होते.