पिंपरी चिंचवडमधून शिवसेना शिदे गटाला मोठी गळती..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मार्च २०२४ निष्ठावंत निष्ठेपासुन लांब राहु शकत नाही गेल्या काही दिवसांपासुन खरी निष्ठा कुठं आहे ज्यांना समजले ते आपल्या निष्ठेच्या माहेरघरी परत येत आहेत असे शहरप्रमुख सचिनभाऊ भोसले बोलले.
ताई तुम्ही खर्या निष्ठावंताच्या शिवसेनेत आल्या बद्दल उपस्थितांचेवतिने मनःपूर्वक स्वागत ही करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधील शिंदे गटातील महिला आघाडी पिंपरी विधानसभा संघटिका अश्विनीताई खंडेराव यांची काल उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश शहरप्रमुख सचिनभाऊ भोसले, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे व शहर संघटिका अनिताताई तुतारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे गटातील लोकांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर गळतीला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शिंदे गटातील अनेक पदाधिकारी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत निष्ठेचा महासागर वाहतच चालणार आहे. असे मत शहरप्रमुख सचिनभाऊ भोसले यानी यावेळी व्यक्त केले.
ही माहिती देताना गणेश आहेर बोलले की “बाप बाप होता है और बेटा बेटा होता है” हे ज्याला ज्याला लक्षात येईल तो तो पून्हा माघारी खर्या शिवसेनेच्या (परतीच्या) मार्गावर असेल.