प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मार्च २०२४ येवूघातलेल्या २०२४ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पार्टीचे व इंडिया आघाडीचे महाराष्ट्रात नेतृत्व करणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाचे सन्माननीय अध्यक्ष उध्दवजी ठाकरे यांच्या तर्फे मावळ लोकसभेचे उमेदवार सन्माननीय, आदरणीय पिंपरी चिंचवड शहराचे लाडके नेते, यूवा असताना पासून राजकारणात सर्किय असलेले, नगरसेवक किंवा महापौर पदावर असताना पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात गोरगरीब, वंचित, दुर्बलांच्या सदैव पाठीशी राहून साथ देणारे नेते श्री. संजोगजी वाघेरे यांना मावळ लोकसभे करिता उमेदवारी देण्यात आली या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिव, छत्रपती शाहू, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीत तत्परतेने काम करणारे आणि दक्षिण भारतीय समाजाचे नेतृत्व करणारे, ख्रिश्चन समाजाचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित श्री. राजन नायर यांनी श्री. संजोगजी वाघेरे यांची सदिच्छा भेट घेऊन आपल्या समाजाच्या वतिने व स्वता: सामाजिक कार्यकर्ते या नात्याने पाठिंबा देत मावळ लोकसभेच्या रिंगनातून आपला ऐतिहासिक विजय होणार असल्याच्या शुभेच्छा निवडनूकी पूर्वीच लोकसभेचे उमेदवार श्री. संजोग वाघेरे यांना दिल्या.