मा. महापौर हनुमंतरावजी भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मार्च २०२४ मा. महापौर हनुमंतरावजी भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त धम्मानंद प्रतिष्ठानने भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धा चषक २०२४ चे आयोजन केले आहे.
यात प्रथम पारितोषिक रु. ४१,०००/- मा. राहुलभाऊ भोसले (मा. विरोधीपक्ष नेते वि.वि. मनपा) यांचे वतिने देण्यात येणार आहे व द्वितीय पारितोषिक रु. ३१,०००/-
डॉ. वैशालीताई घोडेकर (मा. महापौर पिं.चिं. मनपा.) यांचे वतिने देण्यात येणार असल्याचे समजते.
फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धा चषक २०२४ दिनांक –
२९ मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४ पर्यंत असनार आहेत.
स्पर्धेची वेळ सकाळी ९:०० ते सांय ५:०० वा. पर्यंत आहे. या स्पर्धेची प्रवेश फि- ३०००/- असनार आहे.
स्पर्धेचे ठिकाण- डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल हॉकर्स ग्राऊंड, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे- १८. असे असनार आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत राहुलभाऊ भोसले युवा मंच, व अविनाश शंकर चौधरी अध्यक्ष – धम्मानंद प्रतिष्ठाण.