प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२४ मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पाहीजे फरारी व तडीपार आरोपी तसेच संशयीतांची तपासणी मोहिम राबविणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहा. पोलीस फौजदार रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९०७ / २०२३.
आर्म ॲक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ या गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी अमोल जोतीराम घाडगे याचेबाबत माहिती मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, अमोल जोतीराम घाडगे वय-३४ वर्षे रा. कदमवस्ती, कोंडबावी, पो. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास ताब्यात घेवुन, अटक करुन, त्यांचेकडून तपासा दरम्यान ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे, सहा. पोलीस उप-निरीक्षक रमेश गायकवाड, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर यांचे पथकाने केली आहे.