गून्हादेश-विदेशपोलिसमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड पोलीसांची रेनवा टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२४ आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, यांनी आगामी लोकसभा निवडणुक हया भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०७ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३६ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
चिखली पोलीस स्टेशन, गु. रजि. नं. ६०/ २०२४ भादवि. ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, क्रि. लॉ. ॲमे. अॅक्ट कलम ७, आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पो. का. कलम ३७ (१) (३) १३५ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) निलेश पुखराज रेनवा (टोळी प्रमुख) वय २७ वर्षे, रा. टॉवर लाईन, म्हेत्रे वस्ती, चिखली पुणे २) रोहन कमलाकर कावळे वय २१ वर्षे, रा. गणेश इंटरनॅशनल स्कूलजवळ, नेवाळे वस्ती, चिखली पुणे ३) दत्तात्रय संतोष शिंदे, वय २३ वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीणी हौसींग सोसायटी मोरे वस्ती, चिखली, पुणे ४) सुमित विलास क्षिरसागर, वय २० रा. ताराबाई चौक, शिवकृपा कॉलनी, मोरे वस्ती, चिखली पुणे, ०२ विधी संघर्षीत बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
वरील टोळी प्रमुख याने त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी चिखली, वाकड पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. संदिप डोईफोडे मा पोलीस उप-आयुक्त (परि-०३) श्री. शिवाजी पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त ( गुन्हे – १) श्री. बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वपोनि वपोनि श्री. ज्ञानेश्वर काटकर (चिखली पो.स्टे.) पोलीस निरीक्षक श्री. अनिल देवडे (पी.सी.बी गुन्हे शाखा), तसेच अंमलदार पो. हवा. सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, मपोहवा केदार (चिखली पो.स्टे) यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!