आर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बांधकाम व्यवसायकांना लाखो रुपयांचा गंडा घालुन सुमारे ३ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणार्‍या आरोपीस केले जेरबंद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २०२४ गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर असे चिखली पोलीस ठाणे गु. रजि. नं. ७५० / २०२३ भादंवि कलम ४०८ या गुन्हयाचा समांतर तपास करित होते. गुन्हयातील आरोपी साइमन रॉनी पीटर वय ४० वर्षे, धंदा- काही नाही, राह. ए. १/५०९, ब्रुक फिल्डविलोज जवळ,धर्मावद पेट्रोलपंप उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे हा बांधकाम व्यवसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणुन नोकरी करायचा व ग्राहकाकडुन रोख स्वरुपात आलेली लाखो रुपये रक्कम घेवुन पसार होत होता. आरोपी साइमन रॉनी पीटर हा सुमारे ३ वर्षापासुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील बांधकाम व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालुन राहण्याची जागा बदलुन राहत होता.
आज रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी साइमन रॉनी पीटर वय ४० वर्षे धंदा काही नाही राह. ए-१ / ५०९, ब्रुक फिल्डविलोज जवळ, धर्मावद पेट्रोलपंप उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे यास उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे येथे शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषन करुन त्याच्या राहत्या ठिकाणाची गोपनिय माहिती काढुन त्यास वरील पत्त्यावर ताब्यात घेतले आहे.
आरोपी साइमन रॉनी पीटर याचेकडे चौकशी दरम्यान त्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. १००/ २०२२ भादंवि कलम ४०८ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच त्याने हिंजवडी, हडपसर, वनलिका प्रोजेक्ट पिरंगुट, पुणे या परिसरात गुन्हे केल्याचे तपासात प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे सदरबाबत अधिक तपास करित आहोत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे पोलीस अमंलदार सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलीस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी
केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!