शहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगर येथील प्रबुद्ध भारत मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित भव्य मिरवणुकीचे आयोजन.

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर येथील प्रबुद्ध भारत मित्र मंडळ (PBMM GROUP) यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असून, दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० या दरम्यान भव्य मिरवणूक होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग हा चिंचवड स्टेशन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर पिंपरी पर्यंत असेल…
संस्थापक:- अजय कांबळे, अध्यक्ष:- बंटी कांबळे,
उपाध्यक्ष:- दिनेश मोरे, खजिनदार:- नितिन म्हेत्रे तसेच मंडळाचे सर्व सभासद ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे…
मागील अनेक वर्ष भिमजयंती व सर्व महापुरुषांच्या जयंती निम्मित मंडळा मार्फत अन्नदान, रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे अनेक उपक्रम राबविण्यात आले असून पहिल्यांदाच मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्युत रोषणाई, साउंड सिस्टम, फटाक्यांची आतिशबाजी व आकर्षित देखावा हे मिरवणुकीचे आकर्षण असेल.
तसेच बुद्ध पौर्णिमा निम्मित देखील आणखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे संस्थापक अजय कांबळे व बंटी कांबळे ह्यांनी सांगितले…
मंडळाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक, आमदार आण्णासाहेब बनसोडे, प्रसादभाई शेट्टी (नगरसेवक), शैलेशभाऊ मोरे (नगरसेवक), मारुतीशेठ कानडी (सामाजिक कार्यकर्ते) गुलाबपान पाटील (सामाजिक कार्यकर्ते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!