महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

उस्मानाबादेत स्वराज्य शक्ती सेनेचे अधिकृत उमेदवार नौशाद इकबाल शेख बाजी मारणार!!

उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत.

प्रतिनिधी उस्मानाबाद (धाराशिव) दि. २२ एप्रिल २०२४ उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघातून २०१९ मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांना हरवून सव्वा लाख मतांनी विजय मिळवला असताना उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने तसेच या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत..
‘स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणा धनंजय मुंडे’ यांनी “नौशाद इकबाल शेख” यांच्या समाज सेवेतील केलेल्या कार्याची दखल घेऊन व उस्मानाबाद (धाराशिव) येथील जनतेशी असलेल्या उत्कृष्ट जनसंपर्क, पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले असून पत्रकारितेतील त्यांचे प्रदीर्घ अनुभव, सामाजिक चळवळीतील लढा, वारंवार समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे व न्याय मिळवून देण्यासाठी केलेले सतत प्रयत्न ही त्यांची जमेची बाजू पाहून स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने नौशाद शेख यांची धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आली असून नौशाद इकबाल शेख हे मूळचे उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील केसरजवळगा या गावाचे रहिवासी असून त्यांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात खूप मोठा जनसंपर्क आहे.
उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदार संघातून यंदा तिरंगी लढत होत असून या तिरंगी लढतीत एकनाथ शिंदे शिवसेना गट व ठाकरे शिवसेना गट यांच्यात होत असलेले वाद तसेच शरद पवार राष्ट्रवादी गट व अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात होत असलेले दोन्ही पक्षातील वाद पाहता उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदार संघातील जनता संभ्रमात असून येथील जनतेचा कौल नवीन स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना करुणा मुंडे यांचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार नौशाद इकबाल शेख यांच्याकडे वाढलेला दिसत असून येथील जनता स्वराज्य शक्ती सेनेला मतदान करणार असल्याचे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत असल्याने यंदा तिरंगी लढतीतून स्वराज्य शक्ती सेनेचे अधिकृत उमेदवार नौशाद इकबाल शेख हे खूप मोठ्या मतांनी बाजी मारणार असल्याचे चिन्ह पाहताना दिसत आहेत.
उस्मानाबाद ( धाराशिव ) शिवसेना समर्थक ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभेचे उमेदवार शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादीचे अर्चना पाटील……विरोधात आता स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवार नौशाद शेख यांना उमेदवारी जाहीर करून उस्मानाबादच्या मैदानात उडी घेऊन मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचीही तयारी केलीय…
त्यामुळं स्वराज्य शक्ती सेना उमेदवार नौशाद शेख दोन्ही पक्षांच्या अंतरवादात तिरंगी लढतीत बाजी मारणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!