देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने ११ लाख ५० हजार रुपये किंमतीचा २३ किलो वजनाचा गांजा केला जप्त

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ एप्रिल २०२४ मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, परिमंडळ-३ श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये अवैध धंदयावर व आमली पदार्थावर कारवाई करण्याचे आदेश चाकण पोलीस स्टेशन यांना दिलेले होते. त्याप्रमाणे प्रमोद वाघ वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस ठाणे यांनी हददीत सदर करवाई करीता तपास पथकास माहिती काढण्याचे आदेशीत केले होते.
दिनांक २२/०४ / २०२४ रोजी तपास पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड यांना गोपणीय बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, चाकण येथिल आगरकरवाडी रोड वर दुबई कॉलेज समोर चाकण काळुस रोडजवळ देशमुख यांचे शेतामध्ये मोठया प्रमाणावर गांजाची शेती केलेली आहे सदर बाबत माहिती वपोनि प्रमाेद वाघ यांना कळवुन सदर ठिकाणी खात्री करण्याकरीता संदीप पाटिल पोनि सपोनि प्रसंन्न ज-हाड पोसई नामदेव तलावडे व तपास पथकातील पोहवा हनुर्मेत काबळे, संदीप सोनवणे, निखिल वर्पे, रेवन्नाथ खेडकर, माधुरी कचाटे नवनाथ खेडकर, असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता बातमीप्रमाणे मोठया प्रमाणावर गांजा सदर शेतामध्ये लागवड केलेला आढळुन आल्याने सरकारी पंचासमक्ष चाकण गावचे हददीत आगरवाडी रोड लगत जमीन गट नं. २७९ मध्ये मक्याचे शेतात ता. खेड जि. पुणे येथे इसम नामे सदाशिव आप्पासाहेब देशमुख वय ६५ वर्षे, धंदा शेती रा. आगरवाडी रोड, चाकण ता खेड जि पुणे यांचे ताब्यातुन २३ किलो वजनाचा एकुण ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा व्यवसायासाठी वापर केलेल्या गांजाची झाडे जप्त केली असुन चाकण पोलीस ठाणे गुरनं २०१/२०२४ एनडिपीएस ॲक्ट ८ ब २० अ, २० क अन्वये पोसई नामदेव तलावडे यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप पाटील तपास पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड,पोसई नामदेव तलवाडे, सफौ सुरेश हिंगे, पो हवा / रुषीकुमार झनकर, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा /राजु जाधव, पो हवा/ हनुमंत कांबळे, पोहवा भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, पोना / निखील शेटे, पोकॉ / नितीन गुंजाळ, पोकॉ /सुनिल भागवत, पोकॉ /संदिप गंगावणे, पोकॉ / अशोक दिवटे, पोकॉ / प्रदिप राळे, पोकॉ निखील वर्पे, चालक रेवन्नाथ खेडकर, नवनाथ खेडकर, चालक महादेव बिक्कड, पोकॉ /महेश कोळी, मपोकॉ /माधुरी कचाटे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!