आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम वाटप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग यांची कायदेशीर कारवाईची मागणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ मे २०२४ देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभेचे मतदान. देशातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान अतिशय शांततेमध्ये पार पडले त्यामध्येच बहुचर्चित असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये २०७ भोसरी या विधान सभेमध्ये मतदानापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम वाटप केल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेविका यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी सदर ठिकाणी ११२ या क्रमांकावर कॉल करून तात्काळ पोलीस यंत्रणा कक्षास कळवली परंतु त्यांनी सदर ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर तेथील पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या माजी नगरसेवकाने राहिलेली रोख रक्कम ताबडतोब तिथून पसार केली. हा सर्व प्रकार ज्या इमारतीमध्ये चालला होता त्या सर्व इमारतीच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच भोसरी विधानसभेतील निगडी हे अति संवेदनशील वॉर्ड घोषित करूनही सदर विधानसभा क्षेत्रात नियुक्त केलेल्या निवडणूक आयोगाचे स्टॅटिक सर्व्हिलंस व फ्लाईंग स्कॉडमध्ये असणारे एक वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकारी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी एक व्हिडिओ ग्राफर आणि तीन किंवा चार पोलीस कर्मचारी यांच्या पथकावर कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणास्तव योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांतदादा लोंढे सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ॲड. अशोक धायगुडे यांची अप्पर तहसीलदार साहेब, निगडी पोलीस स्टेशन, सहाय्यक निवडणूक ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघ, २०७ भोसरी यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!