गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिस्टलाचा धाक दाखवून लुटमार करणारे हिंजवडी पोलीसांच्या जाळयात हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगीरी..

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. २८ मे २०२४ मा. पोलीस आयुक्त साो. पिंपरी चिंचवड यांनी अवैध रित्या अग्नीशस्त्र किंवा घातक हत्यारे जवळ
बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना दिनांक २५/०५/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, कन्हैया थोरात यांचे सुचनांप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक व तपास पथकतील अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक
नरेश बलसाने, पोलीस हवालदार १५७६ नरळे, पोलीस नाईक १९०१ चव्हाण, पोलीस नाईक १७४८ गडदे, पोलीस शिपाई २४०१ कांबळे, पोलीस शिपाई २४०० शिंदे व पोलीस शिपाई २२८४ पालवे असे दोन वेगवेगळया टिम तयार करुन हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयांवर व अवैध अग्निशस्त्र व घातक हत्यार जवळ बाळगारे इसमांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना तपास पथकाचे प्रभारी राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक यांना माण फेज ३ हिंजवडी पुणे येथे व सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांना सुस ब्रीजखाली सुस पुणे येथे वेगवेगळे दोन इसम गावठी कटटे घेवुन येणार असलेबाबत गुप्त बातम्या मिळाल्याने दोन वेगवेगळया टिमने माण फेज ३ हिंजवडी पुणे व सुस ब्रीज खाली सुस पुणे येथे सापळा लावुन दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अजय शंकर राठोड वय २१ वर्षे, रा. ऐअर रोड चंडा नाईक तांडा, पाषाण वीट भटटी जवळ विजय तिम्हण यांची चाळ पाषाण पुणे व जिशान जहीर खान, वय २३, रा. वॉर्ड नं. ३, दापोडी, पुणे मुळ गाव रा. रसल पुर, मुजफ्फर, ता. नगीना, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले असता इसम नामे अजय शंकर राठोड याचे ताब्यात ५१,०००/- रुपये देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर, दोन जिवंत काडतुस व एक होंडा शाईन असे मिळुन आहे व इसम नामे जिशान जहीर खान याचे ताब्यात ८७,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी कटटा, चार काडतुस व मेपोडे अॅक्टीव्हा मोटार सायकल मिळुन आली आहे.
इसम नामे अजय शंकर राठोड व जिशान जहीर खान हे एकमेकांचे मित्र असुन त्यांनी वरील दोन्ही मोटार सायकल हया बावधन व सुस येथे चोरी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अजय शंकर राठोड व जिशान जहीर खान यांना अटक करुन त्यांचाकडे पोलीस कोठडी रिमांडमध्ये असताना कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी सुस ब्रीज जवळील डोंगरावर पाषाण पुणे येथे त्यांचे इतर तीन साथीदारांसह मिळुन गावठी रिव्हॉलव्हरचा धाक दाखवुन त्याचे अपहरण करुन त्यांचेकडुन त्याचे गळयातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन एकुण ३५,०००/- रुपये किंमतीची एक ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगस्त करण्यात आली असुन त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. ४६९ / २०२४ भा.द.वि. कलम ३९७, ३६४ (अ), आर्म अॅक्ट ३, २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपी यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे.
१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६४२ / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
२) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६६१/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
३) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६७७/२०२४ आर्म अॅक्ट ३, २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे
४) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६८० / २०२४ आर्म अॅक्ट ३, २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे
५) चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. ४६९/२०२४ भा.द.वि. कलम ३९७ ३६४ (अ), आर्म अॅक्ट ३ २५ सह मुपोका ३७ (१) (३) १३५ प्रमाणे
६) चतुश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. २६५ / २०२४ भा. द. वि. क. ३२४, ३४ प्रमाणे
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!