दू:खद वार्ताविशेषशहरसामाजिक
विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून नामांकीत असलेले संजय आणि राजेश स्टीफन यांच्या मातोश्रीचे दू:खद निधन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ जून २०२४ मोनिका स्टीफन यांचे निधन दापोडी मधील ज्येष्ठ नागरिक मोनिका व्हिक्टर स्टीफन यांचे शनिवारी (दि.१) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, दोन मुले, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माध्यम क्षेत्रातील जेष्ठ छायाचित्रकार रूप सिंग यांच्या त्या थोरल्या भगिनी होत. तसेच पुणे, पिंपरी मध्ये विविध वृत्तपत्रात कार्यरत असलेले छायाचित्रकार संजय आणि राजेश स्टीफन यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४:३० वाजता दापोडी, पुणे मुंबई महामार्ग येथील भारतीय ख्रिश्चन दफनभूमी येथे होणार आहे.



