प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि.०१ जून २०२४ नाशिकच्या पाच नागरिकांना ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करणे महागात पडलेले आहे, ऑनलाइन ट्रेडिंग ॲप मार्फत संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींनी त्यांच्या शेअर्स ट्रेडिंग ॲप मधून विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी फिर्यादींना भाग पाडले, फिर्यादींनी संशयतांवर विश्वास ठेवून 19 लाख 83 हजार रुपये भरले ही परंतु अनेक महिने होऊ नये परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पाच नाशिककरांनी नाशिक सायबर क्राईम विभागाला संपर्क करून तक्रारींचा पाढा वाचला,
यासंदर्भात अधिक मिळालेली माहिती अशी की..
सप्टेंबर 2023 मध्ये स्टॉक इन्व्हेस्टमेंट क्लब यांचेमार्फत मोबाईलवर एक लिंक पाठवण्यात आली या लिंक ला प्रसिद्ध प्रतिसाद केला असता संशयतांनी आर एन रेडी ग्रुप या नावाने संपर्क करून नमिषा गुप्ता नामक एडमिन द्वारे शेअर मार्केटमध्ये मोठे परतावे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास पाठपुरवठा केला, यांच्या पाठपुराव्याला बळी पडून फिर्यादी श्री ढगे यांच्यासहित इतर चार गुंतवणूकदारांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले, जमा केलेल्या पैशाने आमच्या मार्फत तुम्हाला विविध कंपन्यांचे शेअर्स घेऊन त्यावर भरघोस परतावे देऊ असे कळवण्यात आले, भूलथापांना बळी पडून तब्बल 19 लाख 83 हजाराचे शेअर्स खरेदी करण्यात आले, परंतु शेअर्स खरेदी केल्यानंतर आठ महिने उलटून गेले तरीही परतावा मिळत नसल्याने फिर्यादी सहित इतरांनी संबंधित कंपनीच्या नंबर वर संपर्क साधला असता संशयतांनी शेअर्स मार्केट पडले असल्याने आम्ही तुम्हाला परतावा देऊ शकत नाही असे सांगून पैसे परत करण्यास नकार दिला व सद्य परिस्थितीमध्ये संपर्क क्रमांक बंद करून संपर्कही तोडला, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात श्री ढगे यांच्यासहित इतर चार फिर्यादींनी नाशिक पोलिसांना संपर्क करून झालेल्या अन्याय बद्दल माहिती दिली यामध्ये अधिक तपास हे नाशिक सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख हे करत आहे.
सध्या परिस्थितीमध्येही नाशिककरांच्या फेसबुक , इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया अकाउंट वर अनेक फेक शेअर्स ट्रेडिंग ॲप व मोठी बक्षीस मिळवून देणाऱ्या ऑनलाईन गेमच्या जाहिराती नेहमी झळकत असतात या जाहिरातींना प्रतिसाद दिले असता नागरिक अशा फसवेगिरी करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकतात व आर्थिक फसवणुकीला बळी पडतात, सदर घटना ही त्याचेच उदाहरण आहे, बदनामीच्या भीतीपोटी अनेक नागरिक हे झालेल्या अन्याय बद्दल कुठेही वाच्यता करत नाही परंतु अशा ऑनलाइन स्कॅम करणाऱ्या इसमांना शोधून स्कॅम करणाऱ्या फेक ॲप च्या जाहिराती नाशिककरांच्या सोशल मीडिया अकाउंट वर येऊच नये यासाठी सायबर क्राईम विभागाने योग्य तांत्रिक उपाययोजना कराव्या अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.