क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

गौरव, जहान गिलसह अर्जुन, फिलोपस रॅली पूर्ण करण्यात अपयशी तांत्रिकबाबींमुळे १४ चालक पडले मागे..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड, महाले नाशिक दि. ०१ जून २०२४ चॅम्पियनशिपचा दावेदार नामांकित कारचालक गौरव गिल,अर्जुन अरोर राव,मथाई फिलोपस आणि जहान गिल यांचे वेगवेगळ्या चरणात नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या बाहेर गेल्याने त्याना रॅली पूर्ण करण्यात अपय़श आले, याशिवाय वेगवेगळ्या गटात आज १४ कारचालक विविध तांत्रिक बाबींमुळे रॅलीचे चरण पूर्ण करू शकले नाही. हे सर्वजण अंतिम चरणात उद्या(ता.२) पूर्ण उतरणार आहे.
ब्लु बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्रचा आजचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. रॅलीच्या पहिल्या २२ किलोमिटरच्या चरणात बोंबीलटेक अंबोली या मार्गावरील मेटकावळे भागात सुरवातीचे कर्णा कदूर,अमित्रजित घोष हे कारचालक गेल्यानंतर अत्यंत वेगात आलेला गौरव गिलचे नियंत्रण सुटल्याने तो एका वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या खाली गेला त्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ आलेला फिलोपस याचे देखील नियंत्रण सुटल्याने तो खाली गेला, या दोन्ही गाड्यां रस्त्यावर आडव्या झाल्याने अन्य कार जाण्यास अडचण झाली आणि त्यामुळे हे संपूर्ण चरणच रद्द करण्यात आले. मात्र या चरणातून सुरवातीला पुढे गेलेले तसेच या दोघांच्या मागे असणाऱ्या कारचालकांना संघटनेने नियमानुसार गुण दिले.
तांत्रिक बाबींमुळे कारचालकांची अडचण बोबींलटेक मेटकावळे, घनवळ, घानवळ, कासोली, अडगाव या परिसरातील अनुक्रमे सहा आणि दहा किलोमिटरच्या चरणांमध्ये विविध गटातील जहान गील, अर्जुन अरोर राव, वेणूनाथ व्ही, प्रदीप रवी आदीं १४ जणांना आपल्या कारमधील तांत्रिक समस्येमुळे चरण पुर्ण करण्यात अपयश आले. आपल्या गाडीतील ही तांत्रिक दूरूस्ती करून उद्या हे सर्वजण सहभागी होणार आहे तर रॅलीतील आणखी एका गटाचा विजेतेपदाचा दावेदार आदीत्य के याने रॅलीतून आपली प्रवेशिका काढून घेतली आहे.
पोशेरा भागात चुरस, गावकऱ्यांचा प्रतिसाद
सकाळ सत्रातील पहिले चरण रद्द झाल्याने तसेच त्यांतील काही स्पर्धक बाहेर पडल्याने स्वभाविकच पोशेरा ते मोरचुंडी, कसोली, हिरवेपाडा, मेटकावळे या साडेनऊ किलोमिटरच्या या चरणामध्ये उर्वरीत स्पर्धेकांमध्ये चुरस दिसली, पोशेरा, कसोली, हिरवेपाडा, मोरचुंडी या घटरस्त्याच्या वळणदार भागातून कार चालवितांना स्पर्धकांनी आपली कसब दाखवली. उंचच उंच डोगरावर उभे असणाऱ्या गावकरी चालकांचे टाळ्या, शिट्या वाजवून स्वागत करत होते, काहीजण आपल्या मोबाईलमध्ये कारची, त्याची छबी टिपण्यात व्यस्त होते तर काहीजण त्यांना व्हि फोर व्हिक्ट्रीची खूण करत विजयासाठी शुभेच्छा देत होते.
चौकट
वेगाने धुराळा उडवणारी वाहने तिसऱ्या चरणात निळमाथी ते ओसिवरा घानवळ, धांदवळ हा जास्त घाट व खडक धुळ मातींच्या रस्त्याचा समावेश होता. पाठोपाठ वेगाने धुराळा उडवत येणारी वाहने आणि घाटात जागेवरच वळण घेतांना वेगावर नियंत्रण करतांना चालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
आजचा निकाल असा- प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमाने
ओव्हरऑल गट

-फाबिद अहमर-१तास ७ मि.५ सेकंद
-हरकिशन वाडीया-१तास८ मि.८ सेकंद
-कर्ण कदूर-१ तास ९ मिनिटे २० सेकंद
आयएनआरसी टू गट
-फाबिद अहमर-१तास ७ मि.५ सेकंद
-हरकिशन वाडीया-१तास८ मि.८ सेकंद
-रामचरण सी-१ तास १५ मि.९ सेकंद
आयएनआरसी थ्री गट
-अजय संकर-१ तास १० मि.
-जित जबाख-१ तास १० मि.९ सेकंद
-अर्जुन राजीव-१ तास १० मि.१३ सेकंद
जिप्सी चॅलेज गट
-बलजिंदरसिंग धिल्लो-१ तास १५मि.४४ सेकंद
-डॉ.आकर्ष सुंदर-१तास १५ मि.४८ सेकंद
-संजय अग्रवाल- १ तास १६ मि.११ सेकंद
क्लासिक गट (एकमेव कारचालक)
-शेख हुसेन पाशा-१ तास ३३ मिनिटे ६ सेकंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!