आर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा व दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची संयुक्त कामगिरी

फोटोची छेडछाड करून फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन व्हॉटसअप करून वारंवार कॉल करून ऑनलाईन खंडणी मागणा-या कोलकता, पश्चिम बंगाल येथील कॉल सेंटर उध्वस्त करुन ०६ आरोपींना दिघी पोलिसांनी केली अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ जून २०२४ गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोड करुन ऑनलाईन खंडणी मागणा-या कोलकता, पश्चिम बंगाल येथील कॉल सेंटर उध्वस्त करुन ते चालवणाऱ्या ०६ आरोपींना अटक करुन त्यांचे कडुन ४,८४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त दिघी पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे श्री. सौरभ शरद विरकर, वय २६ वर्षे, व्यवसाय नोकरी यांनी फिर्याद दिली कि, दि. १५/०५/२०२४ रोजी रात्री ०९.३० वा सुमारास फलॅट नं १००१ / डी २, स्टेला सोसायटी, डुडूळगाव, ता हवेली जि पुणे येथे त्यांचा मावस भाउ नामे किरण नामदेव दातिर, वय ३५ वर्ष याने ऑनलाईन पैसे मागीतल्याचे कारणावरुन राहते घराचे हॉलमध्ये पंख्याला ओढणीचे सहायाने गळफास घेवुन आत्महत्या केली असुन इसम नामे सुरजकुमार व त्याचे साथिदार मोबाईल क्रं. ९३३०६९९३७९, ९२२९३७१७८७, ९१४२८६०११५, ९००७७२७४१०,
७०४४१५७४९९ यांनी मयत किरण नामदेव दातिर याचे मोबाईलवर संपर्क करुन त्यांचा व्हॉटसअॅपचा डीपी काढुन त्याचे फोटोची छेडछाड करून त्याचाच फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैसे मागितले व १२,०००/- रुपये बँकखात्यावर स्विकारून पुन्हा वेगवेगळया फोन वरून कॉल करून त्याला ब्लॅकमेल करून पुन्हा त्याचेकडे ५१ लाख रू दे नाहीतर हे सर्व फोटो गुगलवर टाकुन बदनामी करण्याची धमकी दिली व ५१ लाख रूपयांची खंडणी मागुन इसम नामे किरण दातीर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. म्हणुन दिघी पोलीस ठाणे येथे गुरक्रं. २३९ / २०२४ भा. द. वि कलम ३६०, ३८५, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभिर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आरोपीस अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच सदर बाबत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास चालू होता. तपासी अधिकारी वपोनी विजय ढमाळ दिघी पोलीस ठाणे व वपोनी संतोष पाटील खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनखाली पाहिजे असलेला आरोपी वापरत असलेले मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण दिघी पोलीस ठाणे तपास पथकाचे सपोनीनितीन अंभोरे, पोहवा १०२० किशोर कांबळे व खंडणीविरोधी पथकाचे पोउनी सुनिल भदाणे, पोहवा १३९२ सुनिल कानगुडे, पोहवा ८८१ प्रदिप गोडांबे यांनी करुन आरोपी निश्पन्न केले. दि. ०७/०६/२०२४ रोजी वरनमुद पथक आरोपी यांचा शोध घेण्यासाठी रवाना होवुन आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलकाता येथे असल्याचे निश्पन्न केले तसेच त्या परीसरात सर्च करून फ्लॅट नं ४ / बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल येथे छापा टाकुन फ्लॅट मधुन खालील सहा आरोपी अटक करण्यात आले आहेत.
१) सुरजकुमार जगदिश सिंग, वय २७ वर्षे २) नविनकुमार महेश राम वय २३ वर्षे, ३) सागर महेंद्र राम वय २३ वर्षे, ४) मुरली हिरालाल केवट, वय २४ वर्षे, ५) अमरकुमार राजेंद्र राम, वय १९ वर्षे ६) धिरनकुमार राजकुमार पांडे, वय २५ वर्षे, सर्व रा. फ्लॅटनं ४ / बी चवथा माळा, उदयान सोसायटी नया पट्टी रोड दुर्गाबती कॉलनी, डायमंड प्लाझा जवळ कोलकाता पश्चिम बंगाल. मुळ गाव झारखंड अटक आरोपीकडुन एकुण १५ स्मार्ट मोबाईल फोन, ०७ व्हाईसचेंज मोबाईल्स, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबीट कार्ड, ०८ आधारकार्ड पॅनकार्ड व ०८ नोटबुक असा एकुण ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपी नवीन सिमकार्ड विकत घेवुन जी-मेल वर बनावट नावाने खाते तयार करुन त्याच्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करुन त्यावर फोन आल्यावर कॉल गर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वतःच्या खात्यावर पैसे स्विकारुन बळिताचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचेसोबत आय – किल कंपणीच्या व्हाईसचेंज मोबाईल द्वारे महिलेच्या आवाजात बोलणी करुन त्यावरुन बळितांचे मोबाईल नंबर वरुन त्याचे सोशल मिडीया वरुन फोटो प्राप्त करुन ते फोटो चित्रविचित्र अवस्थेत बनवुन त्यालाच व्हॉटसअप करून त्यांला वारंवार कॉल करून पैश्याची मागणी करुन पैसे स्विकारत होते तसेच कुणी तक्रार करु नये म्हणून फक्त ५ ते १० हजार रुपये स्विकारत होते. नमुद गुन्हयात ०६ आरोपी अटक करण्यात आले असुन ४,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी पोलीस कोठडीत असुन तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ०३, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, विजय ढमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघी पोलीस ठाणे व संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी नितीन अंभोरे व पोहवा किशोर कांबळे दिघी पोलीस ठाणे व पोउनी सुनिल भदाणे, पोहवा सुनिल कानगुडे, पोहवा प्रदिप गोडांबे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!