महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार राहुल महिवाल यांच्याकडे..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ जून २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे दि. ११ जून २०२४ ते दि. २८ जून २०२४ पर्यंत अर्जित रजेवर गेले आहेत. या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासनाने अतिरिक्त कार्यभार श्री. राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
आयुक्त राहुल महिवाल यांनी आज कार्यभार स्विकारत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विभागप्रमुखांसमवेत महापालिकेच्या पिंपरी-चिंचवड येथील मुख्य प्रशासकीय भवनात बैठक घेऊन महापालिका कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीत त्यांनी आषाढीवारी पालखी सोहळा, आपत्ती व्यवस्थापन, नालेसफाई तसेच इतर तातडीच्या विषयाबाबत माहिती घेऊन संबधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत.
मा. आयुक्त श्री. शेखर सिंह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे रजेवरून परत आल्यावर श्री. राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!