आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ बंदची साद.. पिंपरी चिंचवडकरांनी दिला १००% प्रतिसाद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. ०९ सप्टेंबर २०२३ जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या आणि सर्व पक्षांच्या वतीने शनिवारी पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली होती.
या अनूषंगाने सकाळच्या सत्रात पिंपरी-चिंचवडकरांनी १००% प्रतिसाद दिला आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील सर्व भागातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. अनेक शाळा, महाविद्यालयेदेखील बंद होती. निगडी, आकुर्डी, पिंपरी चिंचवड, भोसरी, सांगवी, पिंगळेगुरव, पिंपळे सौदागर, रावेत, मुकाई चौक भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद होती. अनेक कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये देखील बंद होती. काही महाविद्यालयांनी परीक्षेचे आजचे पेपर रद्द केले होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.
पिंपरी कॅम्प, भाटनगर येथून मोर्चा काढण्यात आला. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत शेकडो मराठा बांधव पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आले. दुसरा मोर्चा निगडी येथून पिंपरी चौकात आला. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाले. यात सचिन चिखले, मानव कांबळे, मारुती भापकर, सूनिल गव्हाणे, राजन नायर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, कैलास कदम, माधव पाटील, अजित गव्हाणे, विलास लांडे. ज्योती निबांळकर, विजय पिरंगूटे, सूदाम शिंदे, सचिन भोसले, धम्मानंद साळवे, शिवशंकर उबाळे, मूकूंद रणदिवे, धनाजी येळकर, सूनिता शिंदे, यूसूफ कूरेशी, मिरा कदम, लक्ष्मण राणवडे, अभिमन्यु पवार, प्रदिप कदम, सपना कदम अशा अनेक नेत्यांची भाषणे झाली. तहसिलदार व पोलिस अधिकारी यांना पत्र देवून आंदोलनाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!