आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

माता रमाई आवास योजना, संपूर्ण पिंपरी चिंचवड मधे लागू करावी-प्रा. बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२४ रमाई आवास योजना ही फक्त बालाजीनगर, भोसरी पुणे-२६ येथेच सूरू असून ती संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये सूरू करून गोरगरिबांना या योजनेचा लाभ भेटावा.
रमाई आवास योजना (SC category) मागासवर्गीय अनुसूचित जाती साठीची राखीव योजना आहे. ती फक्त बालाजीनगर भोसरी करिता बंदीस्त ठेवू नये. पिंपरी चिंचवड मधील सर्वांना या योजनेचा लाभ मिळावा. या स्वरूपाचे निवेदन आयूक्तांना देण्यात आल्याचे भीमरत्न, प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक / अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना. आणि अध्यक्ष झोपडपट्टी सेल, आय काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांनी यावेळी सांगीतले.
पूढे ते बोलले की वरील विषयांकित योजना लागू करण्याबाबत आम्ही आमच्या या संघटने अंतर्गत गेली सहा वर्षा पासून सततचा लढा दिला आणि ही योजना आपल्या ( आयूक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका ) सहकार्याने सफल करून दाखवली, परंतु ही योजना आत्ता आम्हाला सदरील ठिकाणी नको असून, हीच रमाई आवास योजना, आपल्या कार्यक्षेत्रातील इतर ठिकाणच्या झोपडपट्यात तसेच चाळी मध्ये हवी आहे,
या योजने कामी सदरील ठिकाणच्या पात्र लाभार्थ्यांना शासनाचे जे अनुदान आलेले आहे, ते अनुदान सदरील ठिकाणचे जे बिल्डर मा. केकाने साहेब आहेत, त्यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी, अशी आमची मागणी असून, हीच योजना इतर झोपडपट्यात लागू करण्यात यावी,
त्यासाठी आम्ही आमच्या सामाजिक संघटने अंतर्गत माता रमाई आवास योजने अंतर्गत शासनाचे अनुदान मिळणे कामी फार्म भरणे सूरू केलेले आहेत. तरी ही रमाई आवास योजना आपल्या महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातून बंद न करता ती पुढे सूरूच ठेवण्यात यावी, अशी विनती वजा निवेदन मा. आयुक्त साहेब तथा अध्यक्ष रमाई आवास योजना समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे १८ यांचे सेवेत देण्यात आले आहे.
यावेळी भीमरत्न ,प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक / अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, हरीचंद्र शिंदे सचिव, लक्ष्मण सिरसाट सह सचिव, रामभाऊ ओव्हाळ, सह संघटक, लक्ष्मण रोकडे (वरिष्ठ पत्रकार) संघटनेचे राज्य संघटक, शिवराज वाघमारे कार्याध्यक्ष, अशोक जावळे उपाध्यक्ष राज्य कार्यकारणी,
युवराज मस्के सदस्य, तुकाराम गव्हाणे सदस्य, दिलीप बनसोडे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!