गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
संभाजी भिडेंना ७ दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..

प्रतिनिधी सोलापूर महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे (मनोहर कूलकर्णी ) यांच्या विरोधात सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. प्रदेश महासचिव अप्पासाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. येत्या ७ दिवसांत संभाजी भिडे यास अटक केली नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा बसपाकडून देण्यात आला.



