प्रतिनिधी पूणे दि. १५ डिसेंबर २०२४ पुणे महानगरपालिका नगरसेवक तथा मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाशभाऊ बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने फकीरा कादंबरी देऊन सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती संदर्भात काम करीत असलेले युवराज दाखले यांच्या कामाचे कौतुक अनिल दादा हातागळे व गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे तसेच नगरसेवक अविनाश भाऊ बागवे यांनी केले.
यावेळी मा. गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, पुणे शहर मातंग समाज मा. सचिव अनिल दादा हातागळे, दयानंद आढागळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, मातंग चेतना परिषद पिंपरी चिंचवड प्रमुख तथा ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कलवले आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते