प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२४ अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे काही श्लोक समाविष्ठ करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारचे सुरु आहे.
असे असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये जर्मन, जापनीज, रशियन, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषा शिकवण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील या निवेदनात म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराज सांगून गेलेत की हे ‘विश्वचि माझे घर’. पण या विश्वासोबत संवाद साधण्यासाठी आपण, आपली पुढची पिढी तयार आहे का? आपल्याला त्यांची भाषा येते का हे पाहिले पाहिजे. परदेशी भाषा शिकल्याने परदेशामध्ये नोकऱ्या मिळू शकतील, तिथे आपण उद्योगधंदे उभारू शकू, तेथील चांगली संस्कृती आणि तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो. असे केल्याने आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांची आर्थिक आणि बौद्धिक उन्नती होऊ शकते. यासाठी पालिकेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, परकीय भाषा विभाग, फोन नंबर 020-25654256 यांना त्वरित संपर्क साधावा असेही माधव पाटील म्हणाले.
हे निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना शहर अध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ, शिक्षण मंडळ माजी सदस्य विनायक रणसुम्भे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, चिंचवड विधानसभा महिला उपाध्यक्ष कोंडे, सामाजिक न्यायचे पदाधिकारी रोहित जाधव आदी उपस्तिथ होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की याच शैक्षणिक वर्षांपासून पालिकेच्या काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर परकीय भाषा शिकवण्यात येईल.