महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मधु तारा दिव्यंगांच्या दारी… रिक्षा चालक दोन्ही संस्थेचे आभारी.

प्रतिनिधी पूणे दि. ०४ जूलै २०२४ साधारण तिन दिवसांन पूर्वी दि. ३० जून २०२४ रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून आणि असक् निराधार वृद्ध आश्रम यांच्या माध्यमातून ताडीवाला रोड नदी किनार झोपडपट्टी मधील ८० वर्षीय दिव्यांग बाबांना मोफत व्हीलचेअर भेट देण्यात आली.
आसक् निराधार वृद्ध आश्रमाचे संचालक अध्यक्ष निराधारांचे आधार कर्मवीर दादा गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. कुशाताई गायकवाड यांच्या माध्यमातून मिळालेली व्हीलचेअर मधु तारा प्रमुख श्री. नितीनजी शिंदे यांनी थेट भिम टोला मित्रमंडळ नदी किनारा ताडीवाला रोड येथे जाऊन गरजू दिव्यांग नायकोडे दादा यांना दिली.
श्री. शिंदे यांचे रिक्षा चालक मित्र श्री. महेबुब शेख यांनी श्री. शिंदे यांना फोन करून माहिती दिली असता आज ही सेवा घडली असे मधु तारा प्रमुख म्हणाले.
या वेळी रिक्षा चालक श्री. महेबुब शेख त्यांच्या पत्नी, रिक्षा चालक श्री. पप्पू भोर त्यांच्या पत्नी आणि श्री. नायकोडे परिवार उपस्थित होते. या वेळी आमचा एक रिक्षा चालक महाराष्ट्र भर मधु ताराचे कार्य करून असंख्य रुग्णांचे दिव्यांगांचे आशीर्वाद घेत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत श्री. महेबुब शेख यांना अश्रू अनावर झाले.
या वेळी सर्वांनी आस्क व मधु ताराचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!